Join us  

... तर मी दोन दिवसांत राजीनामा देतो, कृषीमंत्री सत्तारांचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 12:40 PM

राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नसून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे

मुंबई - शिवसेनेतून फुटल्यानंतर शिंदे गटातील प्रमुख नेते असलेल्या अब्दुल सत्तार आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसून येते. वेदांतानंतर टाटा एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यामुळे आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला आणि राज्य सरकारला लक्ष्य केलं. त्यावेळी, अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंवर टीका करताना त्यांना पप्पू असं म्हटलं. सत्तारांच्या या टिकेला आदित्य ठाकरेंनीही उत्तर दिलं होतं. आता, पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांच्यात शाब्दीक चकमक पाहायला मिळत आहे. त्यातून, सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना सिल्लोडमधून निवडणूक लढवण्याचं चॅलेंज दिलं आहे.  

राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नसून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. त्यातूनच, विरोधकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावरुन, आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. टाटांचा प्रकल्प बाहेर कसा गेला? तारीख कोणती होती? हे आदित्य ठाकरेंनी बारकाईनं पाहिलं तर २१ सप्टेंबर २०२१ मध्ये हा प्रकल्प राज्यातून गेला. त्यावेळेला मुख्यमंत्री यांचे वडील होते. जे बोलतायेत ते कॅबिनेट मंत्री होते. मग या प्रकल्पात काही देवाणघेवाण झाली नाही म्हणून हा प्रकल्प राज्याबाहेर गेला? अशी शंका लोकांमध्ये आहे. छोटा पप्पू पहिले बोलले असते तर आज ही वेळ आली नसती अशा शब्दात अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंवर टिका केली होती. लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण बनवायचं, दिशाभूल करायची असं राजकारण केले तर दुसरे पप्पू म्हणून यांची जागा कुठे असेल सर्वांना माहिती आहे, असेही ते म्हणाले होते. त्यावर, आदित्य ठाकरेंनी 

तर दोन दिवसांत राजीनामा देतो

मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे. मी दोन दिवसांत राजीनामा देऊ शकतो. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला परवानगी द्यावी, असे सत्तार यांनी राजीनाम्यासंदर्भात बोलताना म्हटले. तसेच, चंद्रकांत खैरे आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्याविरुद्ध निवडणूक लढवून सिल्लोडमधून विजय होऊन दाखवावे, असे आव्हानही दिले. गेल्या लोकसभा निवडणुकीत खैरे यांची जीलील यांच्यामार्फत मीच विकेट घेतली होती. आता खैरे चांदीचा गदा घेऊन फिरत आहे. पण, त्यांच्या गदेचा सामना करण्यासाठी आमची ढाल तयार असल्याचं सत्तार म्हणाले. 

दरम्यान, केंद्रीय कृषीमंत्री  नरेंद्र सिंह तोमर हे पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे त्यांची भेट घेऊन राज्यातील अतिवृष्टीबाबत सर्व माहिती देणार आहे. तसेच राज्यातील नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय पथकाने पाहणी करण्याबाबत त्यांच्याकडे मागणी करणार असल्याच सत्तार म्हणाले. 

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाअब्दुल सत्तार