...म्हणून मुंबईत यंदा डेंग्यू, मलेरियाचे प्रमाण कमी झालं; आकडेवारी पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 01:54 AM2020-07-03T01:54:00+5:302020-07-03T01:54:27+5:30
कीटकनाशक विभागाने टोलेजंग इमारती, चाळी, गृहनिर्माण सोसायट्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये शोधमोहीम राबवून डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली आहेत
मुंबई : महापालिकेच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०१६मध्ये मे महिन्यापर्यंत ११४ जणांना डेंग्यूची लागण झाली होती, तर २०२०मध्ये पहिल्या ५ महिन्यांत हा आकडा ३७ आहे. ४ वर्षांपूर्वी मलेरियाची रुग्णसंख्या १ हजार ६२८ होती. ही संख्या यावर्षी ७५३ आहे. महापालिकेने कोरोनाव्यतिरिक्त अन्य आजारांसाठी वेगळी वैद्यकीय व्यवस्था केली आहे. सायन रुग्णालयाच्या परिसरामध्ये कोरोनासाठी रुग्णालयाच्या व्यवस्थेसह वॉर्डनिहाय रुग्णालयांची उपलब्धताही करण्यात आली आहे.
कीटकनाशक विभागाने टोलेजंग इमारती, चाळी, गृहनिर्माण सोसायट्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये शोधमोहीम राबवून डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली आहेत. यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या तब्बल एक लाख आठ हजार २६ छोट्यामोठ्या वस्तू, तसेच ५१४ टायर्स संबंधित ठिकाणांहून हटविले. संबंधित भागात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होणार आहे. भायखळा (ई विभाग)परिसरातून डासांची उत्पत्तीस्थाने बनू पाहणाºया सर्वाधिक म्हणजे १६ हजार ३५५वस्तू हटविण्यात आल्या. त्याखालोखाल जी-दक्षिणमधून नऊ हजार ३५८, एमधून आठ हजार ३२ वस्तू हटविण्यात आल्या. तसेच एफ-दक्षिण विभागातून सर्वाधिक म्हणजे १२३ टायर्स हटविण्यात आले, असे पालिकेचे कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी सांगितले.