मुंबई : मुंबईसारख्या शहरात कर्फ्यू नसेल तर रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर फिरणे गुन्हा नाही, असे निरीक्षण येथील स्थानिक न्यायालयाने २९ वर्षीय तरुणाची निर्दोष मुक्तता करताना नोंदवले आहे. संशयास्पद स्थितीत रस्त्यावर बसलेली व्यक्ती आढळल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.16 जून रोजी न्यायालयाने या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली होतीपीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सुमित कश्यप नावाच्या व्यक्तीवर संशयास्पद परिस्थितीत रस्त्यावर बसल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी 13 जून रोजी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता आणि गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 16 जून रोजी त्याची निर्दोष मुक्तता केली होती. न्यायदंडाधिकारी म्हणाले की, फिर्यादीने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे, आरोपी गुन्हा करण्यासाठी आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करत होता. यावर विश्वास ठेवणे न्यायालयासाठी कठीण आहे. उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला कश्यप हा दक्षिण मुंबईत रस्त्यावर बसलेला आणि रुमालाने तोंड झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
पोलिसांनी कलम १२२ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला होता.पोलिसांनी त्या व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२२ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या कलमांतर्गत, सूर्योदय आणि सूर्यास्तादरम्यान आढळलेल्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा करण्याच्या उद्देशाने चेहरा झाकल्याबद्दल किंवा अन्यथा ओळख लपविल्याबद्दल गुन्हा नोंदविण्याची तरतूद पोलिसांकडे आहे.न्यायालयाने काय म्हटले?न्यायदंडाधिकारी नदीम पटेल म्हणाले, "मुंबईत रात्री दीडच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली. मुंबईसारख्या शहरात रात्री दीड वाजणे म्हणजे उशीर नाही आणि कोणीही रस्त्यावर उभे राहू शकते. त्यामुळे जाणूनबुजून ओळख लपवण्याच्या उद्देशाने हे केले असं म्हणू शकत नाही. आणि तो गुन्हा नाही. हा व्यक्ती रुमालाने चेहरा झाकून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे मान्य करण्यास न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाने कश्यपची निर्दोष मुक्तता करताना असे निरीक्षण नोंदवले की, फिर्यादी पक्ष संशयापलीकडे आरोपीचा गुन्हा सिद्ध करू करण्यास अपयशी ठरला आहे.