...तर डिसेंबरच्या मध्यात सर्वांसाठी लाेकल धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:04 AM2020-11-28T04:04:16+5:302020-11-28T04:04:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून चाचण्यांची संख्या वाढवण्यासोबतच रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचीही चाचणी व ...

... so in mid-December, the lake will run for everyone | ...तर डिसेंबरच्या मध्यात सर्वांसाठी लाेकल धावणार

...तर डिसेंबरच्या मध्यात सर्वांसाठी लाेकल धावणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून चाचण्यांची संख्या वाढवण्यासोबतच रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचीही चाचणी व पडताळणी सातत्याने करण्यात येत आहे. आरटीपीसीआर चाचण्‍यांवर भर देण्‍यात येत आहे. मोठ्या संख्येने फीवर क्लिनिक सुरू करण्यात आले असून त्यामुळे कोरोनाचे समूळ उच्चाटन करता येईल. दिवाळीनंतर पुढील तीन आठवड्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढली नाही तर १५ डिसेंबरच्या आसपास लोकलसह शाळा सुरू होतील, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

मुंबई महापालिकेने कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीही पोलीस, वॉर्ड स्तरासह लोकप्रतिनिधी स्तरावर कोरोनाला हरविण्यासाठीच्या उपाययोजना राबविण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. गणेशोत्सव, नवरात्रौत्सवानंतर दिवाळीत कोरोना रुग्णांची संख्या वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीनंतर परराज्यातून जे नागरिक मुंबईत दाखल होत आहेत, त्यांच्या कोरोना चाचण्या रेल्वे स्थानकांवर केल्या जात आहेत.

दिवाळीनंतर रुग्णांचा आकडा वाढत असला तरी गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवाच्या तुलनेत हा आकडा नियंत्रित असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे. कोरोनाचे प्रमाण वाढले तर साडेबारा हजार खाटा रिक्त आहेत. अतिदक्षता विभागात १ हजार खाटा रिक्त आहेत. जम्बो सुविधा असलेली ९ कोरोना केंद्रे आणि रुग्णालये सुरू आहेत, असे महापालिकेचे म्हणणे आहे. हिवाळ्यादरम्यान प्रदूषण पातळी वाढत असल्यामुळे कोरोना वाढण्याची शक्यता आहे. तापमान व कोरोनाचा थेट संबंध नाही. मात्र, हिवाळ्यात लोकांचे हात धुण्याचे प्रमाण कमी होते. त्याचबरोबर कपडे सातत्याने बदलणे टाळले जाते. यामुळे संसर्गात वाढ होऊ शकते, त्यामुळे पालिका प्रशासनाकडून जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.

अशी सुरू आहे कार्यवाही

- लक्षणे आढळलेल्यांना तातडीने विलगीकरण कक्षांमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे.

- सार्वजनिक शौचालयांचे सातत्याने व नियमित सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.

- सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड घेण्यात येत आहे.

Web Title: ... so in mid-December, the lake will run for everyone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.