...म्हणून मान्सून २०२० मुंबईकरांच्या कायमस्वरुपी लक्षात राहील !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 03:50 PM2020-10-03T15:50:57+5:302020-10-03T15:51:20+5:30

Mumbai Monsoon : यावर्षी दुप्पट पाऊस झाला

... so Monsoon 2020 will be remembered by Mumbaikars forever! | ...म्हणून मान्सून २०२० मुंबईकरांच्या कायमस्वरुपी लक्षात राहील !

...म्हणून मान्सून २०२० मुंबईकरांच्या कायमस्वरुपी लक्षात राहील !

googlenewsNext

 

मुंबई : सांताक्रूझ येथील वेधशाळेत संपुर्ण मान्सूनच्या काळात २ हजार २०६ मिमी पावसाची नोंद होते. यावर्षी दुप्पट पाऊस झाला असून, ही नोंद ३ हजार ६८७ आहे. या व्यतीरिक्त मुंबईला लागून गेलेले निसर्ग चक्रीवादळ देखील कायम स्वरुपी लक्षात राहणार असून, यासह झालेल्या दोन चार मोठया पावसांनी मुंबईकरांना कोरोना एवढाच दणका दिला आहे. परिणामी २०२० मान्सूनची इतिहासात कोरोना सोबतच एक आगळी वेगळी नोंद होणार असून, हा मान्सून मुंबईकरांच्या कायमस्वरुपी लक्षात राहणार आहे.

मान्सून यावर्षी १ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. यापूर्वी २०१३ साली मान्सून केरळमध्ये १ जून रोजी दाखल झाला होता. सलग दुस-या वर्षी मान्सून देशात सरासरी पेक्षा अधिक कोसळला आहे. यावर्षी ही नोंद १०९ टक्के आहे तर २०१९ साली ही नोंद ११० टक्के होती. तत्पूर्वी सलग दोन वर्षे सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस १९५८ आणि १९५९ साली नोंदविण्यात आला होता. जुलै महिन्यात अधिकाधिक पावसाची नोंद होते. यावर्षी मात्र जुलै महिन्यात सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत कमी पाऊस नोंदविण्यात येऊनही पावसाची कामगिरी समाधानाकारक आहे. गेल्या चार दशकांच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे; ही नोंद २७ टक्के अधिकच्या पावसाची आहे. सौराष्ट्र, कच्छ येथे फार काही पाऊस नोंदविला जात नाही. मात्र यावेळी सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत १२६ टक्के अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. गेल्या दशकभरातील हा रेकॉर्ड आहे.

पश्चिम उत्तर प्रदेश एक असे क्षेत्र आहे जेथे यावर्षी सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत ३७ टक्के कमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. या क्षेत्रात कमी पाऊस नोंदविण्यात येणाचे ह पाचवे वर्ष आहे. दिल्ली येथे ४६७.९ मिमी पाऊस नोंदविण्यात आला आहे. जो सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत २० टक्के कमी आहे. मान्सून वेळे अगोदर दाखल होऊन आणि त्याच्या परतीच्या प्रवासाला विलंबाने सुरुवात होऊनही उत्तर पश्चिम भारतात सर्वसाधारण पावसाच्या तुलनेत १७ टक्के कमी पाऊस झाला आहे.

--------------------------

मुंबई आणि पाऊस

१९९३ ते २०२० दरम्यानच्या नोंदी (मिमी)
२३ सप्टेंबर १९९३ : ३१२.४
४ सप्टेंबर २०१२ : १८५.३
२० सप्टेंबर २०१७ : ३०३.७
५ सप्टेंबर २०१९ : २४२.२
२३ सप्टेंबर २०२० : २८६.४

या वर्षीचे मोठे पाऊस (मिमी)
३-४ जुलै : १५७
४-५ जुलै : २००.८
१४-१५ जुलै : १९१.२
३-४ ऑगस्ट : २६८.६
२२-२३ सप्टेंबर : २८६.४

या वर्षीचे महिन्यानुसार पाऊस (मिमी)
महिना : पाऊस
जुन : ३९५
जुलै : १५०२
ऑगस्ट : १२४०
सप्टेंबर : ५२८

Web Title: ... so Monsoon 2020 will be remembered by Mumbaikars forever!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.