Join us

‘तुळशी’एवढे पाणी उपसले : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 1:18 AM

पावसाचा जोर कायम राहिल्याने नायर, कस्तुरबा आणि जेजे रुग्णालयांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : संपूर्ण सप्टेंबर महिन्यात जितका पाऊस पडतो त्यापैकी ८३ टक्के पाऊस मागच्या बारा तासात पडला. धारावी, दादर भागात ३३२ मिमी पावसाची नोंद झाली. वातावरणीय बदलांमुळे दुष्काळ, अतिवृष्टीसारख्या टोकाच्या घटना आता नित्याच्या बनल्या आहेत. या बदलांना सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करत असून नवीन प्रकल्पांची चाचपणी सुरू असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच तुळशी धरणातील पाणीसाठा एवढ्या पाण्याचा उपसा मुंबईतून झाला असल्याचेही ते म्हणाले़पावसाचा रुग्णालयांनाही फटकापावसाचा जोर कायम राहिल्याने नायर, कस्तुरबा आणि जेजे रुग्णालयांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. नायर आणि कस्तुरबा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात पाणी साचल्याने रुग्णांचे हाल झाले तर जे.जे. रुग्णालयाच्या मुख्य इमारत आणि बाळाराम इमारतीच्या तळमजल्यावर पाणी तुंबले. यामुळे लिफ्ट बंद पडल्याने विभाग आणि चाचण्या करण्यासाठी जाणाऱ्या रुग्णांचे हाल झाले. मुंबईत मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा फटका रुग्णालयांनाही बसला. जे.जे. रुग्णालयाच्या मुख्य इमारत आणि बाळाराम इमारतीच्या तळमजल्यावर मंगळवारी रात्रीच पाणी तुंबले. परंतु पंप लावून तातडीने या पाण्याचा निचरा करण्यात आला. मात्र हे पाणी इमारतींच्या लिफ्टमध्ये शिरल्याने लिफ्ट बंद पडल्या आहेत. रुग्ण, नातेवाइकांना पायºया चढूनच वरखाली करावे लागले.मुलुंड, भांडुपला २६ जुलैची आठवणपहाटे साडेतीनच्या सुमारास ४ फुटांपर्यंत पाणी घरात साचले. शक्य तेवढे पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पावसाचा जोर वाढत असल्याने, सामानांचे नुकसान झाले. २६ जुलैच्या पुरानंतर पहिल्यांदा एवढे पाणी घरात शिरल्याचे भांडुपच्या सह्याद्रीनगरचे रहिवासी असलेले हेमेंद्र शृंगारे यांनी सांगितले. शृंगारे यांच्यासारख्या अनेकांच्या घरात पाणी भरले. काही जण झोपेत असल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. मुलुंड, भांडुपमध्ये हीच परिस्थिती होती़गोरेगावच्या मोतीलाल नगरमध्ये घरात पाणी!गोरेगाव पश्चिम मोतीलाल नगर क्रमांक १ येथील नागरिकांच्या घरात कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणी शिरले आहे. मध्यरात्री दोन वाजता येथील घरांमध्ये शिरलेले पाणी सकाळी सहाच्या सुमारास काही प्रमाणात ओसरले, अशी माहिती येथील उदय सोसायटीत राहणारे सामाजिक कार्यकर्ते समीर राजपूरकर यांनी दिली.बोरीवली-कांदिवली सोसायट्या झाल्या जलमयपावसाने कांदिवली, बोरीवली परिसरात जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली. रात्री आणि पहाटेच्या सरींनी, कांदिवली, बोरीवलीकरांना चांगलीच धडकी भरली. बोरीवली आणि मालाड परिसरात गेल्या २४ तासांत अनुक्रमे २०४ आणि २५७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. चारकोपमधील सोसायट्यांमध्ये पाणी भरले. नॅशनल पार्क, दामूनगर, जवळपासच्या झोपडपट्टीत पाणी तुंबले़मुसळधार पावसामुळे उच्च न्यायालयाचे कामकाज बंदमुसळधार पावसामुळे बुधवारी उच्च न्यायालयाचे कामकाज बंद करण्यात आले. त्यामुळे कंगना रनौतच्या याचिकेवरील आणि रिया व शोविक चक्रवर्तीच्या जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवारी होण्याची शक्यता आहे. मुंबई उपनगरात रात्रभर सतत पाऊस कोसळल्याने शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबले. परिणामी उच्च न्यायालयाचे अधिकारी व कर्मचारी वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे शक्य नसल्याने न्यायालयाने बुधवारचे कामकाज तहकूब केले.

टॅग्स :आदित्य ठाकरेपाऊस