...तर मुंबईकर म्हणे १०० कोटींचे टार्गेट पूर्ण झाले का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:07 AM2021-03-23T04:07:19+5:302021-03-23T04:07:19+5:30
मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर टिवटिव लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बमुळे खळबळ ...
मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर टिवटिव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बमुळे खळबळ उडाली असताना, पोलिसांच्या ट्विटर हँडलवरही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. पोलिसांनी मास्क कारवाईचा आकडा टाकताच, नेटकऱ्यांनी १०० कोटींचे टार्गेट पूर्ण झाले का? असा सवाल केला.
सोमवारी मुंबई पोलिसांनी मास्क घालण्याचे आवाहन करत, आतापर्यंत मुंबईत विनामास्क फिरणाऱ्या १ लाख ९१ हजारजणांवर कारवाई केल्याची माहिती ट्विट केली. मुंबई पोलीस आयुक्तांनीही ते रीट्विट केले. अशात, या ट्विटला प्रतिसाद देताना १०० कोटींच्या टार्गेटबाबत नागरिकांकडून सवाल करण्यात आला. यात, काहींनी यातून दंड किती आकारला? हादेखील १०० कोटींच्या टार्गेटचा भाग आहे का? १०० कोटींचे टार्गेट पूर्ण झाले का? असेही प्रश्न उपस्थित केले.