Join us

... म्हणून चित्रपटाचं नाव 'तान्हाजी', वंशजांनी सांगितलं ऐतिहासिक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 1:49 PM

गड आला पण, सिंह गेला या शालेय पुस्तकातील धड्यांमधून बालपणीच तान्हाजी

मुंबई - बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगन, सैफ अली खान आणि काजोल स्‍टारर 'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर' आणि दीपिका पादुकोण स्‍टारर 'छपाक' रूपेरी पडद्यावर एकाच दिवशी रसिकांच्या भेटीला आले. दोन्ही सिनेमाला समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी यात तान्हाजीने कमाईच्या बाबतीत छपाकला बरेच मागे टाकले. तानाजी चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकीकडे तानाजी चित्रपटाचं कौतुक होत असताना, या चित्रपटाच्या नावावरुन वाद निर्माण झाला होता. 

गड आला पण, सिंह गेला या शालेय पुस्तकातील धड्यांमधून बालपणीच तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा अनेकांनी वाचली आहे. अनेकांनी अभ्यासली आहे. त्यावेळी, चौथीच्या पुस्तकात हे नाव तानाजी असं होतं. मात्र, दिग्दर्शकाने चित्रपटात आणि चित्रपटाचे नाव तान्हाजी असे ठेवले आहे. त्यामुळे, अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला, तर हिंदी चित्रपट असल्याने तान्हाजी हे नाव ठेवण्यात आले, असेही काहींनी म्हटले. मात्र, तानाजी मालुसरेंचं खरं नाव तान्हाजी हेच असल्याचं त्यांच्या वंशजांनी म्हटलंय. 

''तानाजी मालुसरेंची जन्मभूमी ही गोडावली, तेथे शंकराच एक मंदिर आहे. तानाजीरावांच्या वडिलांना 8 वर्षांनी तान्हाजी झाले. त्यावेळी, ते शंकराचे भक्त होते, तेथे तपनेश्वराचे मंदिर. या तपनेश्वराच्या मंदिरात महाशिवरात्री एकादशीच्या दिवशी तान्हाजी मालुसरेंचा जन्म झाला. म्हणून त्यांचं नाव तान्हा.. असं ठेवलंय. त्यामुळे, ते तानाजी नसून तान्हाजी आहेत,'' असे तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांनी सांगितलंय.अखेर तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांकडूनच तान्हाजी या नावासंदर्भात स्पष्टीकरण आलंय. विशेष म्हणजे चित्रपटाच्या निर्मित्तीपूर्वीही आमच्यासोबत तान्हाजी चित्रपटाच्या नावासंदर्भात चर्चा झाल्याचंही त्यांच्या वंशजांनी सांगितलंय.  

टॅग्स :तानाजीमुंबईअजय देवगण