...म्हणून बॉम्बे हॉस्पिटलला पोलीस अधिकाऱ्याने धाडली नोटीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 09:20 PM2020-02-20T21:20:38+5:302020-02-20T21:28:59+5:30

पोलीस आयुक्तांनी मागितला अहवाल; कॉन्स्टेबलच्या तक्रारीवर कार्यवाही

... So a notice issued by a police officer to Bombay Hospital | ...म्हणून बॉम्बे हॉस्पिटलला पोलीस अधिकाऱ्याने धाडली नोटीस 

...म्हणून बॉम्बे हॉस्पिटलला पोलीस अधिकाऱ्याने धाडली नोटीस 

Next
ठळक मुद्देअशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्या असल्याचे उपायुक्त (मुख्यालय-१) एन.अंबिका यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठविलेल्या नोटीशीमध्ये नमूद केले आहे.नायगाव सशस्त्र दलात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल सुनिल टिंबे यांचा सहा वर्षापूर्वी अपघात झाला होता.

मुंबई - महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेतर्गंत पोलीस व त्यांच्या जवळच्या नातेवाईकावर पुर्णपणे मोफत उपचार व औषधोपचाराची सवलत असताना येथील बॉम्बे हॉस्पिटलने एका कॉन्स्टेबलवर शस्त्रक्रिया करण्यासाठी दहा हजार रुपये घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संबंधित कॉन्स्टेबलने पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर आता हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाकडून त्याबाबत विचारणा करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्या असल्याचे उपायुक्त (मुख्यालय-१) एन.अंबिका यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठविलेल्या नोटीशीमध्ये नमूद केले आहे.


नायगाव सशस्त्र दलात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल सुनिल टिंबे यांचा सहा वर्षापूर्वी अपघात झाला होता. त्यावेळी त्यांना पोलिसांना विनामूल्य आरोग्य सुविधा उपलब्ध असलेल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता त्यांच्या गुढघ्याची वाटी व टाचेवरील हाड मोडल्याने ऑपरेशन करावे लागेल, त्यासाठी १० हजाराची मागणी करण्यात आली, त्याची पूर्तता केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली, पोलिसांसाठी सरकारकडून मिळणारी रक्कम थेट विश्वस्ताकडे जमा होते, आम्हाला मिळत नाही, त्यामुळे चांगले ऑपरेशन करावयाचे असल्यास पैसे द्यावे लागतील, असे धमकाविण्यात आले होते. त्यामुळे विनाशुल्क सेवा असताना लाच घेण्यात आल्याबाबत संबंधित पोलिसाने गेल्यावर्षी २५ डिसेंबरला पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. त्यानुसार मुख्यालय-१ चे उपायुक्त एन.अंबिका यांनी बॉम्बे हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस बजाविली आहे. लाच घेतल्याने हॉस्पिटलसोबत केलेल्या कराराचा भंग केला आहे. त्याबाबत तात्काळ खुलासा करण्याची मागणी करण्याची सूचना करण्यात आली आहे.

Web Title: ... So a notice issued by a police officer to Bombay Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.