...तर श्वानांच्या मालकांना दंड, तीन दिवसांत १६ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 03:31 AM2018-06-05T03:31:48+5:302018-06-05T03:31:48+5:30

नेपियन्सी, पेडर रोड अशा उच्चभू्र वस्तींतील रस्ते पाळीव श्वानांमुळे अस्वच्छ होत आहेत. या श्वानांच्या विष्ठा रस्त्यावरच सोडून त्यांचे मालकही बिनदिक्कत तेथून निघून जातात.

... So the owners of the dogs have to take action against 16 people in three days, fine | ...तर श्वानांच्या मालकांना दंड, तीन दिवसांत १६ जणांवर कारवाई

...तर श्वानांच्या मालकांना दंड, तीन दिवसांत १६ जणांवर कारवाई

Next

मुंबई : नेपियन्सी, पेडर रोड अशा उच्चभू्र वस्तींतील रस्ते पाळीव श्वानांमुळे अस्वच्छ होत आहेत. या श्वानांच्या विष्ठा रस्त्यावरच सोडून त्यांचे मालकही बिनदिक्कत तेथून निघून जातात़ त्यामुळे अशा मालकांना महापालिकेने कारवाईचा बडगा दाखविण्यास सुरुवात केली आहे़ गेल्या तीन दिवसांमध्ये अशा १६ जणांकडून त्यांच्या श्वानांची विष्ठा रस्त्यावर सोडल्यामुळे दंड वसूल करण्यात आला आहे़ आपल्या श्वानांची विष्ठा उचलून कचऱ्याच्या पेटीत टाका अथवा दंडाला सामोरे जा, असा इशाराच महापालिकेने दिला.
सार्वजनिक ठिकाणे, रस्ते वा पदपथांवर अनेक श्वानमालक किंवा संबंधित ‘केअर टेकर’ हे आपल्या घरातील पाळीव प्राण्याला घेऊन फिरायला येत असतात. अशा वेळी अनेकदा रस्त्यावर, पदपथावर व सार्वजनिक ठिकाणी हे प्राणी विष्ठा उत्सर्जन करतात. यामुळे सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ होण्यासोबतच नागरिकांचे आरोग्यही बिघडू शकते़ याची गंभीर दखल घेऊन ‘डी’ विभाग कार्यालयामार्फत विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे़ या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी आपल्या पाळीव प्राण्याला फिरायला येणाºया व्यक्तींचे प्रबोधन केले जात आहे.
या मोहिमेसाठी ३२ जणांचे पथक कार्यरत आहे. या पथकातील कर्मचारी ‘डी’ विभागातील विविध ठिकाणी फिरून आणि पाहणी करून पाळीव प्राण्यांच्या मालकांशी संवाद साधत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाळीव प्राण्यांनी रस्त्यावर विष्ठा उत्सर्जित केल्यास अशी विष्ठा उचलण्यासाठी ‘शिट लिफ्टर’ हे उपकरण वापरून ती परिसरातील कचºयाच्या डब्यात कशी टाकावी? याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जात आहे. तसेच कुत्र्याने घाण केल्यास पालिकेच्या नियमांनुसार प्रत्येक वेळी ५०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे, अशी माहिती साहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली आहे.

या भागांमध्ये सर्वाधिक त्रास
आॅगस्ट क्रांती मैदान, गिरगाव चौपाटी, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, चर्नी रोड, ताडदेव, गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड), लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग (नेपियन्सी रोड) या परिसरात पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. पाळीव प्राण्यांसह सार्वजनिक ठिकाणी फिरायला येणाºयांची संख्याही मोठी आहे.

यासाठी सुरू केली मोहीम
पाळीव प्राण्यांद्वारे सार्वजनिक ठिकाणी घाण होत असल्याच्या काही तक्रारी महापालिकेच्या विभाग कार्यालयामध्ये आल्या होत्या. त्यानंतर पालिकेच्या विभाग कार्यालयाद्वारे विशेष जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेतील कर्मचारी पाळीव प्राण्यांच्या मालकांशी संवाद साधणार आहेत़ पाळीव प्राण्यांनी रस्त्यावर विष्ठा उत्सर्जित केल्यास अशी विष्ठा उचलण्यासाठी ‘शिट लिफ्टर’ हे उपकरण वापरून ती परिसरातील कचºयाच्या डब्यात कशी टाकावी, याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जात आहे.

Web Title: ... So the owners of the dogs have to take action against 16 people in three days, fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई