... तर पवार.. पवार.. ओरडत, रस्त्यावर दगड भिरकावत फिरायची पाळी येईल, राऊतांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 08:15 AM2023-02-22T08:15:55+5:302023-02-22T08:25:50+5:30

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.

... So Pawar.. Pawar.. It will be his turn to roam the streets shouting and pelting stones, Sanjay Raut by MNS sandeep Deshpande | ... तर पवार.. पवार.. ओरडत, रस्त्यावर दगड भिरकावत फिरायची पाळी येईल, राऊतांना पत्र

... तर पवार.. पवार.. ओरडत, रस्त्यावर दगड भिरकावत फिरायची पाळी येईल, राऊतांना पत्र

googlenewsNext

शिवसेना पक्षात मोठी बंडाळी झाल्यानंतर राज्यात सत्तांतर घडले. त्यानंतर, खऱ्या अर्थाने शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजेच ठाकरे विरुद्ध शिंदे असा वाद विकोपाला गेला. या सर्व वादात उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि महाविकास आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत हे केंद्रस्थानी राहिले. त्यामुळेच, शिवसेनेतील बंडखोरीला त्यांनाच जबाबदार धरले जाते. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदा आणि त्यात त्यांनी केलेली विधाने ही वादग्रस्त ठरली आहेत, आजही ठरत आहेत. त्यामुळे, संजय राऊत यांच्यावर शिंदे गटाकडून पलटवार होतो. मात्र, आता मनसेनंही संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केलीय. मनसेच्या संदीप देशपांडे यांनी चक्क पत्र लिहून राऊत यांना सल्ला दिलाय. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. संजय राऊत यांनी दोन हजार कोटींची डील झाली, हा न्याय नाही, असा मोठा आरोप केला आहे. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी एका गुन्हेगाराला आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप करत यासंदर्भातील तक्रार पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे देण्यात आली आहे. या आरोपांवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर निशाणा साधला. त्यानंतर, आता मनसेनंही पत्र लिहून संजय राऊत यांना सल्ला दिला आहे. तसेच, वेळीच स्वत:ला सावरले नाही, तर पवार... पवार... ओरडत रस्त्यावर दगड भिरकावयाची वेळ येईल, असा टोलाही लगावला आहे. 

संदीप देशपांडे यांचे पत्र 

हे येडxx मला का पत्र लिहतंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण विश्वास ठेवा वा ठेवू नका पण तुमच्याबद्दल तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटीच हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस attention seeking होतो. तुम्ही कितीही नाकारलंत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी.

माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळू हळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल (guilty feeling ) मनाला लावून घेतली आहे, ती पहिले आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच ह्या -हासाला जबाबदार नाहीत. उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत हे लक्षात घ्या. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर पवार... पवार....असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल. कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच ! पटलं तर घ्या...नाही पटलं तर चू xx आहे असं म्हणून विसरून जा !


 

Web Title: ... So Pawar.. Pawar.. It will be his turn to roam the streets shouting and pelting stones, Sanjay Raut by MNS sandeep Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.