Join us

...तर प्रकल्प नाणारला उभारा; बारसू रिफायनीवरुन राजकीय युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 7:38 AM

राज्यात राजकीय भडका कायम असतानाच शेतकऱ्यांची मागणी

जमीन आमची, इमले तुमचे; चालणार नाही : उद्धव ठाकरे

स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्प : मुख्यमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोकणातील बारसू येथे होऊ घातलेल्या रिफायनरीवरुन राजकीय भडका उडाला असतानाच आता स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असेल तर हा प्रकल्प पूर्वनियोजित जागी म्हणजे नाणार परिसरात करावा, अशी मागणी तेथील शेतकऱ्यांकडून पुढे येत आहे. 

दरम्यान, जमीन आमची, इमले तुमचे, असे चालणार नाही, सुपाऱ्या घेऊन स्थानिकांवर प्रकल्प लादू देणार नाही, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. तर  स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्प उभारला जाईल, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच प्रकल्प लोकांवर अन्याय करून जबरदस्तीने आम्ही कुठलाही प्रकल्प करणार नाही. बारसूतील भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच रिफायनरी प्रकल्प पुढे नेला जाईल. बऱ्याच लोकांनी त्यासाठी मान्यता दिली आहे. सध्या प्रकल्पस्थळी माती परीक्षणाचे काम सुरू आहे. ते झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविली जाईल.     - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री 

...म्हणून दिले केंद्राला पत्र

n भारतीय कामगार सेनेची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी झाली. यावेळी ठाकरे यांनी बारसूत प्रकल्प व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठविले या आरोपाचे उत्तर देत आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट केली. n पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प नको, अशी आपली ठाम भूमिका आहे. केंद्राकडून वारंवार विचारणा होत होती म्हणूनच बारसूचा अहवाल मागवून मी पत्र दिले होते. जिथे स्वागत होत असेल तिथे प्रकल्प उभारा, असेही सांगितले होते. नाणार, बारसूबाबतची भूमिका आपली नाही तर तेथील भूमिपुत्रांची आहे. n राज्याच्या मुळावर येणारे प्रकल्प अडवले म्हणून महाविकास आघाडीचे सरकार पाडले गेले, पण लक्षात ठेवा, असे विषय यापुढेही अडवत राहणार, असा इशाराही त्यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस विकासाच्या आड कधीही येणार नाही. विकासाबाबतचे गैरसमज संवादाने निकाली निघायला हवेत. कोकणच्या नैसर्गिक साैंदर्यावर दुष्परिणाम होणार नसेल तर रिफायनरी करावी.     - अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेतेरिफायनरी प्रकल्प किती चांगला आहे व तो बारसूला व्हावा, असे लेखी पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान यांना लिहिले होते. तेच ठाकरे आता या प्रकल्पाला विरोध करत आहेत. रिफायनरीला जेवढे विरोधक आहेत त्याहीपेक्षा जास्त समर्थक आहेत.    - उदय सामंत, उद्योगमंत्री उद्धव ठाकरे हे बारसू प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी असून ते मेच्या पहिल्या आठवड्यात त्या ठिकाणी जाणार आहेत.         - खा. विनायक राऊत

टॅग्स :एकनाथ शिंदेरत्नागिरीउद्धव ठाकरे