...म्हणून राज ठाकरेंची तोफ शिवसेनेवर धडाडली नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 11:08 PM2018-03-18T23:08:56+5:302018-03-18T23:08:56+5:30

आज राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढविला नाही.

... so Raj Thackeray's mortar has not hit the Shiv Sena | ...म्हणून राज ठाकरेंची तोफ शिवसेनेवर धडाडली नाही

...म्हणून राज ठाकरेंची तोफ शिवसेनेवर धडाडली नाही

Next

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी देशातील सर्वच राजकीय पक्षांसमोर मोठे राजकीय आव्हान निर्माण केले आहे. मोदी-शाह या दुकलीसमोर टिकून राहायचे असेल तर परंपरागत वैर विसरून राजकीयदृष्ट्या एक होण्याचे वास्तव सर्वच राजकीय पक्षांनी स्वीकारायला सुरुवात केली आजे. अलीकडेच उत्तरप्रदेशातील निवडणुकीत एकमेकांचे कट्टर वैरी समाजवादी आणि बसपा एकत्र आले. आज राज ठाकरे यांनीही आपल्या भाषणात शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढविला नाही.

शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र यावे असे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना नेहमीच वाटते. ज्यावेळी राज आणि उद्धव ठाकरे भेटले होते तेव्हा दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र येणार का? या चर्चेला उधाण आले होते. राज ठाकरे यांनी आज झालेल्या पाडव्याच्या मेळाव्यामध्ये शिवसेनेवर बोलण टाळलं. त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे. मोदींच्या राजकीय आव्हानामुळे राज यांनीही शिवसेना, उद्धव विरोध बाजूला सारावा लागतो का, मोदी-शाह दुकलीमुळे तरी ठाकरे बंधू एकत्र येतील का, हा येणारा काळच ठरवेल.

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे - 

  • या लोकांना झटका द्या. महाराष्ट्राचं हित जपणारा मुख्यमंत्री हवा आहे.

  • नीरव मोदी, मेहुल चोकसी यांनी जे घोटाळे केले, ते पैसे गेलेले आहेत, त्याची भरपाई सर्वसामान्य माणसाला करायचीय  

  • देशात सत्ता परिवर्तन झालं आणि नोटबंदीची चौकशी झाली, तर 1947नंतरचा देशातील सगळ्यात मोठा घोटाळा असेल

  •    नोटाबंदी करून, जीएसटी आणून गुजराती माणसाचीच मोदींनी वाट लावली. एकही गुजराती माणूस मोदींबद्दल चांगलं बोलत नाही. 

  • महाराष्ट्राचा वाळवंट होतोय हे इस्त्रोने सांगितलंय, पण त्याची कोणालाच किंमत नाही

  • मोदी मुक्त भारतासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र या, एकत्र लढा. भारताला झालेला हा आजार संपवावाच लागेल.

  • मोदीमुक्त भारत करायचा असेल तर देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावं  

  • भज्यांची गाडी हाही रोजगारच आहे, असं अमित शहा म्हणतात. मग मोदी इतके देश फिरले ते वड्याचं पीठ आणायला गेले होते का?

  • नाणार प्रकल्पाला विरोधच, कोकणाचा विनाश करणाऱ्या कुठल्याच प्रकल्पाला जमीनी विकू नका - राज ठाकरे 

  • पकोडा विकणं हा रोजगार आहे, असं अमित शाह म्हणाले, मग मोदी एवढ्या देशांमध्ये वड्याचं पीठ आणायला फिरले का?  

  • 1977 साली भारताला दुसरं स्वातंत्र्य मिळालं होतं, 2019 साली भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे, आज मोदीमुक्त भारताची गरज 

  • आपण जातीपातींत गुरफटलोय. एकमेकांचा दुःस्वास करायला लागलोय. कशासाठी छत्रपतींचं नाव घ्यायचं आपण?

  • मुंबईत मेट्रो मार्गालगतच्या सर्व जुन्या इमारती घेण्याचा परप्रांतियांचा डाव, मराठी माणसांना हुसकावण्याचा हा डाव आहे. बेसावध राहून चालणार नाही. महाराष्ट्र फक्त जातीपातीत गुरफट

  •  राज्य आणि केंद्र सरकार लोकांच्या हिताचं नाही  

  • नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या डोक्यात काय सुरू आहे हे न समजण्याइतका मी दुधखुळा नाही

  • मी विश्वासाने नरेंद्र मोदींचं नाव सुचवलं. पण, गुजरातमध्ये माझ्यासमोर खोटं चित्र उभं केलं होतं. खरा माणूस आता कळायला लागला.

  • मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा मार्ग म्हणजे बुलेट ट्रेन

  • बाहेरच्या राज्यातली अल्पसंख्यांकांच्या नावाखाली शाळांमध्ये भरती केलेली मुलं सरस्वती वंदनेच्या वेळी बाहेर जाऊन उभं राहतात : राज ठाकरे

  • लोकांच्या खात्यात 15-15 लाख रुपये टाकू असं मोदींनी निवडणुकीपूर्वी सांगितलं आणि नंतर तो चुनावी जुमला होता असं सांगितलं, तुम्ही लोकांना वेडं बनवलं  

  • दाऊदबाबत एक वर्षापूर्वी जे बोललो होतो, ते आता खरं ठरतंय, तो भारतात यायला तयार आहे

  • राम मंदिर निश्चित व्हायला पाहिजे, पण निवडणुका जिंकण्यासाठी, दंगली घडवण्यासाठी राम मंदिर असेल तर ते पुढच्या वर्षी झालं तरी चालेल

  • राम मंदिराच्या प्रश्नावरून येणाऱ्या काळात देशात दंगली घडवल्या जातील, राज ठाकरेंचा केंद्रावर खळबळजनक आरोप

  • मुंबई महाराष्ट्राला मिळू नये यासाठी जवाहरलाल नेहरूंवर सरदार पटेलांचा दबाव, आचार्य अत्र्यांच्या पुस्तकाचा दाखला देत राज ठाकरेंचा आरोप

  •   मुंबई मिळाली नाही याची गुजराती नेत्यांना अजुनही सल, मुंबईतून अनेक मोठी कार्यालये हलवण्यात येताहेत

  • एक लाख दहा हजार कोटींचं कर्ज घेऊन बुलेट ट्रेन प्रोजेक्ट कोणासाठी आहे 

  • मुंबईतील बीकेसीत निर्माण होणारं फायनन्शिअल सेंटर मोदींनी गुजरातला पळवलं, त्याने राज्यात 70 ते 80 हजार नोकऱ्या निर्माण झाल्या असत्या, एअर इंडियाचं कार्यालयही मुंबईतून हलवलं
  • बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकार 25 टक्के रक्कम देणार आहे, म्हणजे आणखी कर्ज काढावं लागणार आणि राज्य पुन्हा कर्जाच्या ओझ्याखाली जाणार 
  • ज्या ज्या देशांचे प्रमुख भारतात आले, त्यांना अहमदाबादेत नेलं, इतर शहरांमध्ये का नेत नाहीत? 
  • सध्याच्या सरकारमध्ये बोफोर्स घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा झाला आहे. पण, त्याच्या बातम्या बाहेर येत नाहीत  
  • बेरोजगारांची नोंदणी करायची नाही, असा फतवा केंद्र सरकारने काढलाय, यामुळे भविष्यात भारतात किती बेरोजगार आहेत याची माहितीच मिळणार नाही  
  • महाराष्ट्रातल्या तरुणांना नोकरी नाही, बाहेरुन येतायत त्यांना घरं दिली जात आहेत, महाराष्ट्रात सुखी कोण आहे?
  • महाराष्ट्रात जातीपातीचे भांडणं आहेत, आरक्षणासाठी भांडणं आहेत, पण बाहेरुन येणारे नोकरी मिळवत आहेत  
  • महाराष्ट्रात बसवलेला मुख्यमंत्री, स्वतःच्या आत्मविश्वासावर आलेला नाही  
  •  धर्मा पाटीलांची जमीन २०४ गुंठे आहे तिथे त्यांना ४ लाख मोबदला दिला गेला, आणि बाजूच्याच जमिनीला जी ७४ गुंठे आहे, तिला कोट्यवधी रुपये दिले गेले
  • दलाल राज्य करत आहेत- राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
  • एवढी मोठी चूक केल्यावरही सरकारबद्दल काही बोलायचं नाही. त्यांच्याविरोधात काही लिहून येत नाही. 
  • देशातला मीडिया आणि वर्तमानपत्रं. इतरांच्या बाबतीत रकानेच्या रकाने भरून येणार. 
  • विलासराव देशमुख ताजमध्ये गेले, त्यात राम गोपाल वर्मा होते. केवढी टीका. या सरकारकडून घडणाऱ्या गोष्टींवर ब्र काढायला तयार नाही. 
  • विश्वदीपक न्यूज प्रॉड्युसरने राजीनामा दिला. हा सगळा मीडिया सरकार नियंत्रित करतोय. काय बातम्या द्यायच्या, कशा द्यायच्या. सगळ्या मालकांना सांगितलं गेलंय. काही ठिकाणी पत्रकार, संपादकांना काढून टाकलं. मोदी आणि शहांनी सांगितलं. त्यांच्या विरोधात बातम्या दिल्यात, तर जाहिराती बंद करून टाकणार. 
  • कोणत्या देशात जगतोय आपण? ही आणीबाणी नाही तर काय आहे? श्रीदेवीची बातमी जितक्या वेळा टीव्हीवर दाखवली, तितक्या वेळा न्यायमूर्ती लोयांच्या खुनाच्या बातम्या दाखवल्या का? आता १०० न्यायाधीशांच्या बदल्या. 
  • न्यायाधीशांवरही सरकारचा दबाव. हे सगळं तंत्र अॅडॉल्फ हिटलरच्या पुस्तकात मिळेल. जे विरोधात आहेत, त्यांना संपवून टाकायचं किंवा घाबरवायचं. या गोष्टींसाठी माझा मोदींवर राग. 
  • जे मेट्रोचं काम चालू आहे, त्याच्या विरोधात बातम्या द्यायच्या नाहीत, असं सगळ्यांना सांगितलंय. याला लोकशाही म्हणणार आपण? हे अच्छे दिन? 
  • महाराष्ट्रासारखं एक राज्य गप्प बसलंय. वाट्टेल ते आकडे सांगतात. नितीन गडकरींना तर हौसच आहे. साबणाचे फुगे उडवत असतात. कुठेही गेले एक लाख कोटी, दोन लाख कोटींचे फुगे उडवतात. ते आले की करा 'फू'
  • ५६ हजार विहिरी बांधल्या म्हणे. मी विरोधासाठी विरोध करणारा माणूस नाही. महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या हिताची गोष्ट केली तर सरकारचं अभिनंदन करेन. मी कोता नाही.
  •   आजच्या काळातले मनोज कुमार. सरकारच्या चित्रपटांमध्ये काम करतोय. भारत, भारत जे चालू आहे 
    पण अक्षय कुमार हा कॅनडाचा नागरिक नाही. 

  • पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेम कथा हे सिनेमे सरकार स्पॉन्सर करतंय, हे काम करायला अक्षय कुमार आहे 

  • शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. कम्युनिस्टांचा झेंडा हातात घेतला, मग हे शेतकरी की नक्षली, अशी चर्चा. 
  • दलाल राज्य करताहेत. 
  • वृत्तपत्र, चॅनल्स, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं 
  • मोदी आणि अमित शाह यांच्या सांगण्यावरुन कित्येक वृत्तपत्र आणि चॅनल्समध्ये पत्रकारांना, संपादकांना काढून टाकण्यात आलं
  • श्रीदेवीची बातमी मीडिया दाखवते परंतु, न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची बातमी का दाखवली नाही 
  • असेल मोठी अभिनेत्री. पण असं काय क्रांतिकारी कार्य की तिचा पार्थिव देह राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळला गेला होता? 
  • श्रीदेवीने असं काय काम केलं होतं, ज्यामुळे तिचा मृतदेह राष्ट्रध्वजामध्ये गुंडाळण्यात आला?  
  • देशात, महाराष्ट्रात काय चाललंय समजतच नाही. नीरव मोदी प्रकरण चालू होतं. अचानक श्रीदेवी गेल्याची बातमी मिळाली. नीरव मोदी हे प्रकरण मागे पडावं म्हणून श्रीदेवीचं प्रकरण तापवत बसले. हजार कोटी घेऊन पसार झाला देशातून.  
  • ४० वर्षानंतर हा कोण सांबा. नंतर कळलं मुनगंटीवार. दगडावर चढून. हातवारे करत. रजनीकांतचा बारावा डमी. हे काय काम आहे का मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांचं. 
  • तो गाण्याचा अल्बम मी बघितला. मला सुरुवातीला कळलं नाही की ते गाताहेत की शारीरिक कसरती करताहेत? वर्गातला मॉनिटर आहे. 
  • मुख्यमंत्री म्हणजे वर्गातला मॉनेटर आहेत; शिक्षकांचा आवडता, पण विद्यार्थ्यांचा नावडता 
  • गेल्या वर्षी कौटुंबिंक कारणामुळं सभा घेता आली नाही, यावर्षीपासून प्रत्येक वर्षी मनसेची सभे होणार 
  • महाराष्ट्रात सध्या काही गंभीर प्रश्न आहेत असं वाटत नाही. सर्व प्रश्न संपलेले आहेत. सर्व ठिकाणी आनंदीआनंद. सर्वच प्रश्न संपले असल्यामुळे मुख्यमंत्री, अर्थमंत्री गाणं गाताहेत. 
  • बरेच दिवस झाले फुल फ्लेज बोललो नाही. 
  • सर्वांना गुडीपाडव्याच्या शुभेच्छा
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष संपला असं ज्यांना वाटतं, त्यांनी व्यासपीठावर यावं आणि हा जिवंत महाराष्ट्र पाहावा

Web Title: ... so Raj Thackeray's mortar has not hit the Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.