मुंबई : नववर्षानिमित्त बाहेरगावी जाण्या-येण्यासाठी वर्ष अखेरीस जादा एक्स्प्रेस, मेल सोडण्यात आल्याने सोमवारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा त्रास कुटुंबासह फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला.सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी मुंबईतील चौपाट्यांसह इतर ठिकाणी भेटी देण्यासाठी आणि नवे वर्ष साजरे करण्यासाठी ठिकठिकाणांहून नागरिक मुंबईत दाखल होत आहेत. मात्र, मध्य रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे त्यांचे वेळेचे नियोजन काहीसे कोलमडले.नववर्षानिमित्त बाहेरगावी जाण्या-येण्यासाठी जादा एक्स्प्रेस, मेल सोडण्यात आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. रविवारीदेखील रेल्वे मार्गांवरील मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांना गर्दीला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने जादा लोकल सोडल्यामुळे सेलिब्रेशन करून रात्री उशिरा घरी येणाऱ्यासाठी फायदा झाला.
...म्हणून वर्षअखेर कोलमडले रेल्वेचे वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 3:28 AM