म्हणून ती सतत दचकायची... रडायची...; १३ दिवसांनी फुटली अत्याचाराला वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 06:27 AM2023-04-27T06:27:49+5:302023-04-27T06:29:45+5:30

१३ दिवसांनी फुटली अत्याचाराला वाचा

So she used to cry continuously...; Read the tyranny that broke out after 13 days | म्हणून ती सतत दचकायची... रडायची...; १३ दिवसांनी फुटली अत्याचाराला वाचा

म्हणून ती सतत दचकायची... रडायची...; १३ दिवसांनी फुटली अत्याचाराला वाचा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आई तू नको, मी आणते, दे पैसे माझ्याकडे असा हट्ट करून दुकानात चिकन आणण्यासाठी गेलेली मुलगी अचानक शांत झाली. ती दचकू लागली. घराबाहेर पडण्यास घाबरू लागली. तब्बल १३ दिवस तिने घरातच रडत बसून काढले. अखेर कुटुंबीयांनी तिला जेवायला एका हॉटेलमध्ये नेऊन तिची विचारपूस केली. त्यानंतर या मुलीने कोवळ्या वयात तिच्यासोबत घडलेल्या विकृत अत्याचाराला वाचा फोडली.

मुलीसोबत घडलेली घटना ऐकून कुटुंबीयांनाही धक्का बसला. त्यांनी हॉटेलमधूनच थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ तपासाला सुरुवात केली. घटनास्थळावरील पुसटशा अशा एका सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपी रिक्षाचालक साजीद अली हैदर शेख (३२) याला ताब्यात घेतले. ट्रॉम्बे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॉम्बे परिसरात पीडित ९ वर्षीय मुलगी राहते. गेल्या १२ ते १३ दिवसांपासून ती सतत शांत आणि घाबरून राहत होती. तिच्यातील बदलामुळे आईने तिला एका हॉटेलमध्ये जेवयाला नेले. तेथे आई आणि मोठ्या बहिणीने तिला विश्वासात घेत चौकशी करताच, तिने १२ एप्रिलच्या रात्री घडलेला प्रकार सांगितला.

असा केला अत्याचार
 रात्री साडेदहा वाजता चिकन आणण्यासाठी ती दुकानात गेली असताना एका व्यक्तीने तिला जबरदस्तीने सार्वजनिक शौचालयात नेले. तेथे अंधारात तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
 घाबरलेल्या तिने पळ काढत घर गाठले. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवत पोलिस निरीक्षक दिलीप चव्हाण, पोलिस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तपास सुरू केला.  अखेर, पोलिसांनी आरोपीच्या वर्णनावरून अली याला ताब्यात घेतले.

Web Title: So she used to cry continuously...; Read the tyranny that broke out after 13 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.