..मग खुशाल घ्या 288 जागा - उद्धव

By admin | Published: October 12, 2014 01:40 AM2014-10-12T01:40:15+5:302014-10-12T01:40:15+5:30

चीन आणि पाकिस्तानने बळकावलेली भारताची जागा आधी मिळवा; मग खुशाल महाराष्ट्रातील सर्व 288 जागा लढवा,

..so take 288 seats - Uddhav | ..मग खुशाल घ्या 288 जागा - उद्धव

..मग खुशाल घ्या 288 जागा - उद्धव

Next
>ठाणो : चीन आणि पाकिस्तानने  बळकावलेली भारताची जागा आधी मिळवा; मग खुशाल महाराष्ट्रातील सर्व 288 जागा लढवा, असे खुले आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला ठाण्यातील सेंट्रल मैदानावरील प्रचारसभेतून दिले. 
आनंद दिघे आपल्यात नसले तरी त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या तालमीत घडलेले  योद्घे आपल्यासोबत असल्यामुळे मला चिंता नाही.   केंद्रीय मंत्र्यांना टेम्पोमध्ये उभे राहून भाषण द्यावे लागते, याची त्यांनी चांगलीच खिल्ली उडवली. भाजपच्या एका नेत्याने आधी कोट दिला, आता पायजमा द्या, असे वक्त व्य केले होते, त्याचा समाचार घेताना उद्धव म्हणाले,  इतके दिवस बिनपायजम्याचे फिरत होता की काय?  शिवछत्रपतींचे होर्डीग्ज लावून नुसता तमाशा चालला आहे. 
यावेळी ठाकरे यांनी युती तोडल्याचे खापर पुन्हा भाजपावर फोडून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, आधी युतीची बोलणी राज्यातील नेते करायचे. आता दिल्लीवरुन ती केली जाते. बोलणी करताना ठाणो आणि जळगाव मागितले होते. या दोन्ही जागांवर शिवसेनाच जिंकून येते. शिवसेनाप्रमुखांनी हे माझं ठाणो असल्याचे म्हटले होते. वसंतराव मराठेंपासून ठाण्यावर शिवसेनेचे राज्य आहे. केवळ तुम्ही सांगता म्हणूान ठाण्याशी असलेले  नाते कसे तोडणार? ते कदापी शक्य नाही असे त्यांनी सुनावले. (प्रतिनिधी)
 
भाजपाला हिंदुत्वाशी नाते तोडल्याची खंत नाही
च्बदलापूर - लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेनेही रक्ताचे पाणी केले आहे, याची कल्पना भाजपातील दिग्गज नेत्यांनाही आहे. आज हे नेते जेव्हा प्रचारासाठी महाराष्ट्रात येतात, तेव्हा त्यांना शिवसेनेशी युती तोडणो हे हिंदुत्वाशी नाते तोडण्यासारखे वाटते. मात्र, स्थानिक भाजपा नेत्यांना खंत वाटत नाही, असा आरोप ठाकरे यांनी केला. 
च्ठाकरे म्हणाले की,  आमचा पक्ष कोणत्याही प्रकारच्या सव्र्हेवर विश्वास ठेवत नाही. आम्ही केवळ शिवसैनिकांच्या मेहनतीवर विश्वास ठेवतो. सव्र्हेचे आकडे काही असोत, पण महाराष्ट्रात शिवसेनाच एक नंबरचा पक्ष राहणार आहे.

Web Title: ..so take 288 seats - Uddhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.