... म्हणून महाराष्ट्रात 'तानाजी' करमुक्त करा, देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्याना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 07:30 PM2020-01-15T19:30:21+5:302020-01-15T22:38:12+5:30
मुंबई - अभिनेता अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेल्या, शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित चित्रपट ' तानाजी : द अनसंग ...
मुंबई - अभिनेता अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेल्या, शूरवीर तानाजी मालुसरेंच्या जीवनावर आधारित चित्रपट 'तानाजी: द अनसंग वॉरियर' हा महाराष्ट्रात करमुक्तकरा, अशी मागणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून तानाजी चित्रपटाला महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्यात यावे, असे म्हटले आहे. तसेच, छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अधिकाधिक शिवभक्त आणि मराठीजनांपर्यंत हा चित्रपट पोहोचणे आणि या ऐतिहासिक स्मृतींचे जतन होणे अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच, त्यांच्या शौर्याचे स्मरण होण्यासाठी तानाजी हा चित्रपट राज्यात करमुक्त करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशनंतर 'हरियाणा'तही टॅक्स फ्री, शूरवीर 'तानाजीं'च्या महाराष्ट्रात कधी?
देशातील इतर राजांनी हा चित्रपट करमुक्तीचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे तानाजींचे कार्यक्षेत्र असलेल्या महाराष्ट्रात हा निर्णय त्वरेने होणे गरजेचे आहे, असेही फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे. अजय देवगणचा तानाजी आणि दीपिका पादुकोणचा 'छपाक' रूपेरी पडद्यावर एकाच दिवशी रसिकांच्या भेटीला आले. दोन्ही सिनेमाने आतापर्यंत चांगली कमाई केली असली तर यांत तानाजीने कमाईच्या बाबतीत छपाकला मागे टाकले आहे. तानाजी चित्रपटाने 2020 मधील 100 कोटींचा टप्पा गाठणारा पहिला चित्रपट म्हणून मान मिळणार आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने राज्यात तानाजी चित्रपट करमुक्त केला होता. त्यानंतर, आता हरियाणातील भाजपा सरकारनेही तानाजी चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
'छपाक' व 'तान्हाजी'मध्ये कोणी मारली बाजी?, जाणून घ्या आतापर्यंतचे कलेक्शन
‘तानाजी’ चित्रपट करमुक्त करा!
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) January 15, 2020
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी pic.twitter.com/yp1e12UpxI
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंच्या कोंढाणा किल्ल्याची शौर्यगाथा तानाजी चित्रपटाच्या माध्यमातून 70 मिमी पडद्यावर आली आहे. कोंढाणा किल्ला घेताना धारातिर्थी पडलेल्या तानाजी यांच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे म्हटले होते. त्यानंतर, कोंढाणा या किल्ल्यास सिंहगड असे नाव देण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला म्हणून सिंहगड गणला जातो. महाराष्ट्राच्या रणभूमीत तानाजी मालुसरेंनी पराक्रम गाजवला. त्यामुळे, अजय देवगणची भूमिका असलेला तानाजी चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा, अशी मागणी होत आहे.
'तान्हाजी: द अनसंग वॉरियर'ची घौडदौड सुरूच, लवकरच मोडणार हा रेकॉर्ड
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही महसूलमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तानाजी चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश आहे. सध्या, तानाजी अन् छपाक चित्रपटावरुन देशात राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेससह डाव्या पक्षांकडून छपाकला समर्थन देण्यात येत आहे, तर भाजपाकडून तानाजी चित्रपटाला पाठिंबा मिळत आहे