... म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 03:23 PM2022-04-18T15:23:01+5:302022-04-18T15:29:00+5:30

Raj Thackrey : त्यांना या दौऱ्यात उत्तर प्रदेश सरकार विशेष सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

... So the central government will provide security to MNS president Raj Thackeray? | ... म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार?

... म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवणार?

googlenewsNext

मुंबई - मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा देण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या  संघटनेने धमकी दिली होती. त्यामुळे केंद्र सरकारकडून आता राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा काल पुण्यातील पत्रकार परिषदेत केली आहे. त्यांना या दौऱ्यात उत्तर प्रदेश सरकार विशेष सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मनसेकडून राष्ट्रवादी पुन्हा टार्गेट, जेम्स लेनच्या मुलाखतीनंतर प्रथमच आली रिअ‍ॅक्शन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात ३ मेपर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर आता त्याविरोधात पीएफआय या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. छेड़ोगे तो छोडेंगे नही असे म्हणत लाऊडस्पीकरला हात लावल्यास आम्ही शांत बसणार नाही असा इशारा या संघटनेने मनसेला दिला होता. गुढीपाडव्यापासून राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्याला हात घातला आहे. माझा मुद्दा हा धार्मिक नसून सामाजिक असल्याचे त्यांनी म्हटले होते.

राज ठाकरे ५ जूनाला अयोध्येत जाणार; मात्र जाण्यापूर्वी संजय राऊतांनी दिला एक खास सल्ला

Web Title: ... So the central government will provide security to MNS president Raj Thackeray?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.