... तर नव्या चिन्हावरुनही वाद? ठाकरेंनी सूचवलेली 3 चिन्हे आयोगाच्या यादीत नाहीतच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 10:02 AM2022-10-10T10:02:36+5:302022-10-10T10:03:01+5:30

निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून त्रिशूल, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल ही तीन नवीन चिन्हे पोटनिवडणुकीसाठी देण्यात आली आहे

... So the controversy over the new sign? The symbols suggested by Uddhav Thackeray are not in the Commission's list | ... तर नव्या चिन्हावरुनही वाद? ठाकरेंनी सूचवलेली 3 चिन्हे आयोगाच्या यादीत नाहीतच

... तर नव्या चिन्हावरुनही वाद? ठाकरेंनी सूचवलेली 3 चिन्हे आयोगाच्या यादीत नाहीतच

googlenewsNext

मुंबई - निवडणूक आयोगाने शिवसेनेतील उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही, असे सांगितले आहे. दोन्ही गटांना सोमवारी दुपारपर्यंत चिन्हांचे तीन पर्याय पसंतीक्रमानुसार द्यायचे आहेत. त्याचा निर्णय आयोग सोमवारी घेणार आहे. मात्र, आयोगाच्या निर्देशानुसार शिवसेनेकडून तीन चिन्हांची सूची आयोगाला पाठविण्यात आली आहे. याबाबत, स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधताना ही चिन्हे जनतेला दाखवली. मात्र, सध्या निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असलेल्या चिन्हांच्या यादीत यापैकी एकही चिन्ह नाही, त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून त्रिशूल, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल ही तीन नवीन चिन्हे पोटनिवडणुकीसाठी देण्यात आली आहे. त्यापैकी, त्रिशुल या चिन्हाला प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच, पक्षासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना बाळासाहेब ठाकरे ही तीन नावेही सूचविण्यात आली आहेत. मात्र, शिवसेनेनं सूचवलेल्या तीन चिन्हांपैकी एकही चिन्ह आयोगाच्या यादीत उपलब्ध नाही. त्यामुळे, शिवसेना आणि आयोग यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता दिसून येते. 

निवडणूक आयोगाकडील १९७ चिन्हांची यादी

एअरकंडिशनर । अलमारी । सफरचंद । ऑटो रिक्षा । बेबी वॉकर । फुगा  । बांगड्या । फळांची टोपली । बॅट । फलंदाज । बॅटरी टॉर्च । मोत्यांचा हार । बेल्ट । बेंच । सायकल पंप । दुर्बीण । बिस्कीट । ब्लॅक बोर्ड । मानव व पालयुक्त नौका । पेटी । ब्रेड । ब्रेड टोस्टर । वीट । ब्रिफकेस । ब्रश । बादली । केक । कॅल्क्युलेटर । कॅमेरा । कॅन । सिमला मिर्ची । कार्पेट । कॅरम बोर्ड । फुलकोबी । सीसीटीव्ही कॅमेरा । साखळी । जाते । लाटणे-पोळपाट । चप्पल । बुद्धिबळाचा पट । चिमणी (धुराडे) । चिमटी (क्लिप) । कोट । नारळाची बाग । कलर ट्रे व ब्रश । संगणक । संगणक माउस । बाज । क्रेन । क्यूब । कपबशी । कटिंग प्लायर । हिरा । डिझेल पंप । डिश अँटेना । डोली । डोअर बेल । दरवाजाचे हॅण्डल । ड्रिल मशीन । डंबेल्स (व्यायामाचे) । इअर रिंग्ज । विजेचा खांब । लिफाफा । एक्स्टेंशन बॉक्स । बादली । फुटबॉल । फुटबॉल खेळाडू । कारंजे । झगा । फ्राइंग पॅन । नरसाळे । ऊस-शेतकरी । गॅस सिलिंडर । गॅस शेगडी । भेटवस्तू । अर्द्रक । काचेचा ग्लास । ग्रामोफोन । द्राक्ष । हिरवी मिरची । हातगाडी । हार्मोनियम । टोपी । हेडफोन । हेलिकॉप्टर । हेल्मेट । हॉकी-बॉल । घटिकापात्र । आइस्क्रीम । पाणी गरम करण्याचे हीटर । इस्त्री । फणस ।  किटली । किचन सिंक । भेंडी । लेडी पर्स । लॅपटॉप । लॅच । पोस्टाची पेटी । लायटर । लुडो । लंच बॉक्स । तुतारी वाजवणारा माणूस । काडीपेटी । माइक । मिक्सी । नेलकटर । गळ्यातील टाय । नूडल्स बाउल । कढई । पँट । शेंगादाणे । नाशपाती । मटर । पेन ड्राइव्ह । पेनाची पत्ती सात किरणांसह । पेन स्टँड । पेन्सिल बॉक्स । पेन्सिल शार्पनर । पेंडुलम । मुसळ-उखळ । पेट्रोलपंप । फोन चार्जर । तकिया ।  अननस । थापी । अन्नाने भरलेली थाळी । प्लेट स्टँड । भांडे (घागर) । प्रेशर कुकर । पंचिंग मशीन । रेझर । रेफ्रीजरेटर । अंगठी । रोड रोलर ।  रोबोट । रूम कुलर । रूम हिटर । रबरी शिक्का । सेफ्टी पीन । करवत ।  शाळेची बॅग । कात्री । शिलाई मशीन । जहाज । बूट । शटर । सितार ।  उड्या मारण्याची दोरी । पाटी । साबणदाणी । पायमोजे । सोफा । पाना (स्पॅनर) । स्टॅपलर । स्टथोस्कोप । स्टूल । स्टम्प । झोका । स्विच बोर्ड ।  सिरीन्ज । टीव्ही रिमोट । टेबल । चहा गाळणी । टेलिफोन । टेलिव्हिजन ।  टेनिसबॉल । मंडप । भालाफेक । टॉफीज । टीलर । चिमटा । टूथ ब्रश ।  टूथ पेस्ट । ट्रे । त्रिकोण । ट्रक । ट्रम्पेट । ट्यूबलाइट । टाइपरायटर ।  टायर । व्हॅक्यूम क्लिनर । व्हायोलिन । काठी । वॉल हूक । वॉलेट ।  आक्रोड । टरबूज । पाण्यीच टाकी । विहीर । व्हील बारो । शिट्टी । खिडकी । सूप । वूल ॲण्ड नीडल । नागरिक । कचराकुंडी

शिंदे गटानेही निश्चित केली ३ चिन्हे

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीत चिन्ह, नावाबाबत चर्चा झाली. माहितीनुसार, तुतारी, गदा आणि तलवार यापैकी एक चिन्ह मिळावं अशी शिंदे गटाची अपेक्षा आहे. शिंदे गटाकडून अधिकृत पत्रक काढत याबाबत माहिती जाहीर करण्यात येईल. त्याचसोबत शिंदे गटाकडून पक्षाच्या नावात शिवसेना बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे नाव लावण्याचा मानस असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Web Title: ... So the controversy over the new sign? The symbols suggested by Uddhav Thackeray are not in the Commission's list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.