Join us

"... म्हणून आत्ताच निवडणुका होणार नाहीत"; प्रियंका चतुर्वेदींनी सांगितलं मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 7:39 PM

आगामी लोकसभा २०२४ च्या निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत

मुंबई - इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी विरोधी पक्षातील बहुतांश नेते मुंबईत आले आहेत. सोनिया गांधींपासून ते स्टॅलिन, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल हेही राजधानी मुबंईत आहेत. त्यातच, केंद्र सरकारने अचानक ५ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. त्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीका करायला सुरुवात केलीय. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर प्रतिक्रिया देताना देशात कधीही निवडणुका लागू शकतात, असे म्हटले. मात्र, शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदी सरकारमध्ये निवडणुका घ्यायची हिंमत नाही, असे म्हटले आहे.  

आगामी लोकसभा २०२४ च्या निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत. भाजपाकडून पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी सर्वोतोपरी तयारी सुरू असून केंद्रीयमंत्र्यांना अनेक राज्यात पाठवण्यात येत आहे. तसेच, भाजपाशासित राज्यातील सरकारद्वारे जनतेला मोदी सरकारच्या कामाची आणि राज्य सरकारच्या योजनांचा माहिती देण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेससह विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी उभारली असून भाजपचा पराभव हेच लक्ष्य असल्याचे सर्वांनी म्हटलं आहे. याच इंडिया आघाडीतील बैठकीदरम्यान, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदी सरकारमध्ये निवडणुका घ्यायची हिंमत नसल्याचे म्हटले. तसेच, यामागील कारणही त्यांनी सांगितले. सरकारमध्ये निवडणुकांना सामोरे जायची हिंमत नाही. त्यामुळे, सध्या निवडणुका होणार नाहीत. अयोध्येतील राम मंदिर पूर्ण होईपर्यंत हे निवडणुका घेणार नाहीत, यांच्याकडे तो आत्मविश्वास नाही. महाराष्ट्रात लोकसभेच्या पोटनिवडणुका होणे गरजेचं आहे, पण अद्यापही त्याच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत. हे विद्यापीठाच्या निवडणुका घेत नाहीत, एवढं घाबरतात, असे म्हणत खा. चतुर्वेदी यांनी मोदी सरकावर जोरदार निशाणा साधला.   

हिंदुविरोधी काम केलंय - चतुर्वेदी

केंद्र सरकार आणि संसदीय कामकाज मंत्र्यांनी विशेष अधिवेशनाबाबत माहिती द्यायला हवी होती. अधिवेशनासाठी हीच तारीख का ठरवण्यात आली आहे?, असा सवालही प्रियंका चतुर्वेदींनी विचारला आहे. आता, हिवाळी अधिवेशन होत असताना मध्येच हे विशेष अधिवेशन का बोलावण्यात आले आहे. बिहारमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या कमी करण्यात आल्या होत्या. त्यावेळी, भाजपने मोठा गदारोळ घातला होता. आता, याच भाजप सरकारने हे हिंदुविरोध काम का केलंय, असा सवालही प्रियंका चतुर्वेदी यांनी विचारला आहे.

डिसेंबरमध्ये होतील निवडणुका - बॅनर्जी

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकांबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष डिसेंबर महिन्यातच आगामी लोकसभा निवडणुका घेऊ शकते. कारण, भाजपाने निवडणुकांच्या प्रचारासाठी अगोदर हेलिकॉप्टर बुक केले आहेत. पण, जर भाजपाला देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली तर मनमानी कारभाराचे सरकार, निरंकुश सरकार देशवासीयांना मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :शिवसेनानिवडणूकभाजपालोकसभा