Join us

तर त्यानाही मूळ गावी परतण्याची परवानगी द्यावी ....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 5:24 PM

हजारो शिक्षक मूळ गावापासून दूर अडकून; शिक्षकांच्या प्रवासासाठी परवानगी पास देण्याची मागणी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या निर्जबंधामुळे आज दुसऱ्या राज्यातील , जिल्ह्यातील , शहरातील अडकून पडलेले मजदूर वर्ग, विद्यार्थी सारेच आपल्या मूळ गावी जाण्यासाठी धडपडत आहेत. यातच जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षकांचाही समावेश आहे. राज्यातील शैक्षणिक धोरणातील नियमांमुळे सर्व जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यांतील अनेक शिक्षक कार्यरत आहेत. लॉकडाऊनमुळे तसेच २ मे पासून शाळांना अधिकृत उन्हाळी सुट्ट्या लागणार असल्यामुळे शिक्षकांना आपापल्या जिल्ह्यात जाण्यासाठी स्थलांतर परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिक्मषक संघटना करत असून राज्य सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास शिक्षक लॉकडाउनमध्ये अडकून पडतील, अशी भीतीही ते व्यक्त करत आहेत.राज्यातील जिल्हा परिषद शाळांत शकेडो किलोमीटर अंतरावर असलेल्या मूळ घरापासून जाऊन शिक्षक ज्ञानदानाचे काम करत असतात. सद्यपरिस्थितीत अनेक शिक्षकांच्या कुटुंबाना कौटुंबिक आर्थिक समस्यांना समोरे जावे लागत आहे. तसेच  राज्यातील  सर्व शाळा बंद आहेत. येत्या २ मेपासून राज्यातील सर्वच शाळांना अधिकृतरीत्या उन्हाळी सुट्टी लागणार आहे. या सुट्ट्या लागल्यानंतरही लॉकडाउनमुळे सर्व जिल्हा सीमा बंद असल्याने शिक्षकांना त्यांना त्यांच्या जिल्ह्यात जाता येणार नाही. त्यामुळे ते आपल्या गावापासून व कुटुंबापासून दूरच राहणार आहेत. राज्यातील जिल्हा परिषद, नगर₹पालिका, महापालिका व संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक शाळेतील शिक्षकांना आपण नोकरी करत असलेल्या जिल्ह्यांतून मूळ गाव असलेल्या जिल्ह्यात स्थलांतर करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी  भाजपा शिक्षक आघाडीने सरकारकडे केली आहे.सध्या ३ मे नंतर लॉकडाऊन संपेल अशी आशा वाटत नाही. त्यामुळे जिल्हासंचारबंदी उठून आपल्याला घरी जाता येईल की नाही या संभ्रमात अनेक शिक्षक आहेत. तेव्हा या शिक्षकासाठी परवानगी पासची सोय करून त्यांना आपल्या मूळ गावी जाऊ द्यावे अशी विनती शिक्षक सहकार संघटनेचे संतोष  पिट्टलवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

टॅग्स :शिक्षकमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या