मुंबई - देशभरात देशभक्तीचा फिव्हर दिसून येत आहे. मनोकुमार यांच्या मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती... हे गाणे चौका-चौकात अन् सरकारी कार्यालयातून ऐकू येत आहे. तर सर्वच शासकीय आणि संस्थांत्मक ठिकाणी तिरंग्याला मानवंदना देऊन 72 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत आहे. त्यामध्ये बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींकडूनही देशवासियांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागनेही देशवासियांना ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
सोशल मीडियावरुनही देशभक्तीचा फिव्हर पाहायला मिळत आहेत. गावागावात होत असलेले 72 व्या स्वातंत्र्यदिनाचे फोटो आणि सेलिब्रेशन फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवरु दिसत आहे. तर, सेलिब्रिटी आणि दिग्गजांकडूनही ट्विटवरद्वारे देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ज्याप्रमाणे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्याचप्रमाणे आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवणे कठीण आहे. जर आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले नसते तर, आज 'टीम इंडिया'ही नसती, असे भावनिक ट्विट सचिन तेंडुलकरने केले आहे. तसेच देशवासियांना शुभेच्छा देताना स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची आठवण सचिनने काढली.
तसेच टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागनेही भावनिक आणि ह्रदयस्पर्शी फोटो शेअर करुन ट्विटरवरुन देशवासियांना शुभेच्छा दिल्या. तसेच कुछ नशा तिरंगे की आन का है,कुछ नशा मातृभूमि की शान का है,हम लहरायेंगे हर जगह ये तिरंगा,नशा ये हिन्दुस्तां के सम्मान का है।स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं !
असा संदेशही सेहवागने आपल्या ट्विटमध्ये लिहिला आहे.