...तर दिवसाला १ लाख व्यक्तींचे लसीकरण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:06 AM2021-03-15T04:06:35+5:302021-03-15T04:06:35+5:30
पालिका प्रशासन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सध्या सुरू असणारी लसीकरण केंद्रे ही ८ ते १२ तास या कालावधीसाठी ...
पालिका प्रशासन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या सुरू असणारी लसीकरण केंद्रे ही ८ ते १२ तास या कालावधीसाठी कार्यरत आहेत. ती २४ तास कार्यरत झाल्यास दिवसाला १ लाख व्यक्तींचे लसीकरण करणे सहज शक्य होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेने व्यक्त केला आहे, तर आणखी २९ रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेद्वारे यापूर्वीच शासनाकडे पाठविला आहे.
खासगी रुग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रे २४ तास सुरू ठेवण्यास नुकतीच मुभा मिळाली असून, ६० वर्षे पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींचे सध्या लसीकरण करण्यात येत आहे. ४५ ते ५९ या वयोगटातील सहव्याधी असलेल्या व्यक्तींचेही लसीकरण सुरू आहे. या दोन्ही वयोगटांतील व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी १ जानेवारी २०२२ रोजीचे वय विचारात घेतले जात आहे. यानुसार आज ज्यांचे वय ५९ वर्षे ३ महिने किंवा सहव्याधी असणाऱ्या गटातील व्यक्तीचे वय ४४ वर्षे ३ महिने असले तरीही त्यांची लसीकरणासाठी नोंदणी करणे व नंतर लसीकरण करणे शक्य आहे.
ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे ३० लाख आहे. ही बाब लक्षात घेतल्यास तसेच दिवसाला १ लाख व्यक्तींचे लसीकरण झाल्यास साधारणपणे महिनाभरात मुंबईतील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झालेले असेल. ज्या रुग्णालयांना लसीकरण केंद्रे सुरू करण्यास यापूर्वीच केंद्र सरकारद्वारे परवानगी मिळाली आहे, परंतु ज्यांनी अद्याप लसीकरण केंद्र सुरू केले नाही, अशा रुग्णालयातील लसीकरण केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे.
............................