..म्हणून आम्ही मतदान करतो!

By admin | Published: October 14, 2014 01:14 AM2014-10-14T01:14:32+5:302014-10-14T01:14:32+5:30

मतदान हा हक्क आणि कर्तव्य असल्याच्या भावनेने मतदान करणा:यांची संख्या राज्यात सर्वाधिक असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

..so we vote! | ..म्हणून आम्ही मतदान करतो!

..म्हणून आम्ही मतदान करतो!

Next
मुंबई :  मतदान हा हक्क आणि कर्तव्य असल्याच्या भावनेने मतदान करणा:यांची संख्या राज्यात सर्वाधिक असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. मतदान करण्याबाबत किंवा करण्यातील अडचणींबाबत मतदारांची मते जाणून घेण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने संयुक्तपणो हे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणातून अनेक वैशिष्टपूर्ण बाबी पुढे आल्या आहेत.
या सर्वेक्षणानुसार, 87.5 टक्के मतदारांनी मतदान हा हक्क आणि कर्तव्य असल्याच्या भावनेतून मतदान करणार असल्याचे म्हटले आहे, तर 33. 75 टक्के लोकांनी उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व आणि पूर्वइतिहास पाहून मतदानास प्रवृत्त होत असल्याचे सांगितले. त्याखालोखाल 18.75 टक्के लोकांनी निवडणूक आयोगाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मतदान करणार असल्याचे म्हटले, तर तितक्याच लोकांनी कुटुंबप्रमुखाच्या आग्रहाखातर मतदान करणार असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे राजकीय कारणासाठी मतदानाला उतरणारा मतदारराजा केवळ 16.25 टक्के आहे आणि आपल्या जाती- धर्माच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मतदान करणारे केवळ 3.75 टक्के आहे.
मतदान न करण्यामागील विविध कारणोदेखील सर्वेक्षणात स्पष्ट झाली.  सर्वेक्षण नमुन्यातील तब्बल 91.66 टक्के लोक मतदार यादीतून नाव गहाळ असल्यामुळे मतदानापासून वंचित राहणार आहेत. 7क् टक्के मतदारांकडे अद्याप मतदान ओळखपत्र नाही, 13.33 लोक मतदानाच्या दिवशी मतदारसंघाबाहेर आहेत, 3.33 टक्के लोकांना मतदार स्लीप मिळालेली नाही, तर 5 टक्के मतदार मतदानाने काय बदलणार आहे, असा विचार करून मतदान करणार नाहीत, असे लक्षात आले. 
33 टक्के पात्र मतदार आयोगाला अपेक्षित वैध कागदपत्रे नसल्याने किंवा त्याबद्दल माहिती नसल्याने मतदार नोंदणीपासून वंचित राहिल्याचेही याच सर्वेक्षणात लक्षात आले आहे. (प्रतिनिधी) 
 

 

Web Title: ..so we vote!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.