हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनीएकनाथ शिंदे यांना दिलं होतं. यानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी आदित्य ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला आहे. तसंच ठाण्यातून का निवडणूक लढवत नाहीत असा सवालही केलाय.
“आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना राजीनामा देऊन वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान करत आहेत. पण वरळी का? जर आदित्य ठाकरेंना इतकाच विश्वास असेल तर त्यांनी ठाण्यात जावं आणि एकनाथ शिंदेंविरुद्ध निवडणूक लढवावी. २०१९ मध्ये आदित्य ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या सचिन अहिर यांच्यामुळे जिंकले होते,” असं मोहित कंबोज म्हणाले.
शिंदे गटाच्या नेत्याचाही निशाणाशिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. आदित्य ठाकरे तुम्ही वरळीतून आव्हान देत आहात हे ऐकलं. तुम्ही आव्हान देण्याची गरज नाही. एवढीच इच्छा असतील तर एकनाथ शिंदे साहेबांचे जे कट्टर सैनिक आहेत, आमच्यासारखी लोक ते तुमच्यासोबत लढायला तयार आहेत, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या. तसेच तुम्हाला एक प्रश्न विचारते. वरळीतून आपल्याला ६ हजारांच्यावर नोटाची मते मिळाली आहेत. तुम्ही ज्या वरळीचे आमदार आहेत, तिथे तुमचे साधे जनसंपर्क कार्यालय नाही. लोकांना प्रश्न घेऊन जायचे असेल तर तुम्हाला भेटता येत नाही अन् तुम्ही वरळी ए प्लस करायला निघाला आहात, असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, तुम्हाला त्या वरळीत दोन अधिक आमदार द्यावे लागले. एका वरळीत तीन तीन आमदार आहेत. तरी सुद्धा तुम्हाला माजी नगरसेवक संतोष खरात सारखी व्यक्ती ठाकरे गटाला सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे आले. तुम्हाला धमकी देण्याचीच इच्छा असेल, तुमचा पराभव व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर त्यासाठी आमच्या सारखे शिवसैनिक वरळीतून लढायला तयार आहेत. त्यासाठी शिंदे साहेबांना वरळीच्या मैदानात उतरण्याची गरज नाही, या शब्दांत शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला.