...तर बॅलेट पेपरला का घाबरता?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 05:21 AM2019-09-05T05:21:19+5:302019-09-05T05:22:17+5:30

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल

... so why bother with ballet paper?, vijay vadettivar | ...तर बॅलेट पेपरला का घाबरता?

...तर बॅलेट पेपरला का घाबरता?

Next

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुती २२९ जागा जिंकेल हा भारतीय जनता पक्षाचा फाजील आत्मविश्वास आहे. सर्व्हे मॅनेज करण्यात भाजपचा हातखंडा असून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, जर त्यांना एवढा ठाम विश्वास असेल तर अन्य पक्षातील नेत्यांची त्यांना गरज का पडावी, आणि असेल हिंमत तर निवडणुका मतपत्रीकेवर घेऊन दाखवा असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

निवडणुका आल्यावर हवे तसे सर्व्हे भाजप करुन घेत असते. काँग्रेसचा पराभव होईल असे अंदाज व्यक्त करण्यात आलेले याआधीचे अनेक सर्व्हे सपशेल खोटे ठरलेले आहेत. आम्हीच पुन्हा सत्तेवर येऊ असे चित्र निर्माण करून एकप्रकारे निवडणुकीचे निकाल प्रभावित करण्याचाच हा प्रकार आहे. सर्व्हे करुनच निवडणुका जिंकता आल्या असत्या तर निवडणूक आयोगाची गरजच काय? भाजपचे आकडेच खरे मानून निकाल जाहीर करावेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Web Title: ... so why bother with ballet paper?, vijay vadettivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.