... म्हणून तो तरुण दिल्लीला गेला अन् पवारांसोबतच्या प्रवासाने गावचा प्रश्नच सुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 07:07 PM2020-02-08T19:07:20+5:302020-02-08T19:11:44+5:30
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मैराळ सांगवी येथील सारंग जाधव या तरुणास
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्यासमेवत दिल्ली ते पुणे प्रवास करण्याचा दुग्धशर्करा योग परभरणीतील एका शेतकरी कुटुंबातील तरुणाला मिळाला. या तरुणानेही या संधीचे सोनं करत आपल्या मतदारसंघातील समस्या कानावर घातली. विशेष म्हणजे शरद पवार यांनीही तात्काळ ती समस्या सोडविण्यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना सांगतो, असे आश्वास्त केले. पवारांसोबतच्या प्रवासाचं वर्णन करतान सारंग जाधव उत्साही होता.
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मैराळ सांगवी येथील सारंग जाधव या तरुणास शुक्रवारी दिल्ली ते पुणे असा विमानप्रवास करायची संधी मिळाली होती. या प्रवासात सारंगच्या शेजारील सीटवर होते चक्क राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार. सारंगसाठी हा सुखद धक्काच होता. त्यामुळेच, उत्साही सारंगने या प्रवासातील काही क्षण फेसबुक लाईव्हद्वारे सोशल मीडियात आणले. त्यानंतर, पवारांसमेवत शेतकरी कुटुंबातील मुलाचा प्रवास व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडीओत शरद पवार विमानातील खिडकीतून सारंगला पुणे, मगरपट्टासह विविध भागांचे दर्शन घडवताना दिसत आहेत.
परभणीचे खासदार संजय उर्फ बंडु जाधव यांनी सारंगला दिल्ली दाखविण्यासाठी दिल्लीला नेले होते. या दिल्ली दौऱ्याच्या परतीच्या प्रवासात सारंगला शरद पवार यांच्याशेजारील सीटवर बसण्याचा योग लाभला. यावेळी पवारांनीही सारंगशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. विशेष म्हणजे सारंगची समस्याही ऐकून घेतली. गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचा प्रश्न सारंगने शरद पवार यांच्या कानावर घातला. त्यावेळी, खासदार बंडू जाधव यांनी प्रशासकीय पातळीवर हा प्रस्ताव विचारधीन असल्याचे सांगितले. त्यावर, जयंत पाटलांना सांगून तो प्रश्न मार्गी लावतो, असे आश्वासन पवार यांनी दिले. पवारांसोबतच्या या प्रवासाचा सारंगसह गंगाखेड तालुक्यालाही मोठा फायदा होणार आहे.
दिल्ली ते पुणे दरम्यान विमान प्रवासात आदरणीय पवारसाहेबांच्या शेजारी बसण्याची संधी परभणीतल्या सर्वसामान्य तरुणाला मिळाली. परमभाग्य म्हणजे विमानातून खाली दिसणाऱ्या परिसराची खडा न खडा माहिती प्रत्यक्ष साहेबांकडून या तरुणाला ऐकायला मिळाली.@PawarSpeakspic.twitter.com/Eq1nSnh2kJ
— NCP (@NCPspeaks) February 7, 2020