Join us

'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 9:26 AM

Anna Hazare On Sharad Pawar : खासदार शरद पवार यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. या टीकेला आज हजारे यांनी प्रत्युत्तर दिले.

Anna Hazare On Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. राज्यातील प्रचारसभा संपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी पवार यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे आणि बीएमसीचे माजी अधिकारी जी.आर. खैरनार यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, ते दोघेही आता कुठे दिसत नाहीत, अशी टीका शरद पवार यांनी अण्णा हजारे यांच्यावर केली होती. या टीकेली आता सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  

पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत

"दहा, बारा वर्षे झालीत त्यांना आता कशी जाग आली मला माहित नाही, त्यांचे मी बारा वर्षापूर्वी काही मंत्री घरी पाठवले. बारा वर्षानंतर त्यांना आता जाग आली, एक तप गेले. शरद पवार यांचे नातलग पद्मसिंह पाटील त्यांचे मी ज्यावेळी पुरावे काढले तेव्हा राजीनामा द्यावा लागला, असं प्रत्युत्तर आण्णा हजारे यांनी शरद पवार यांना दिले. समाजाच्या हितासाठी पुरावे बाहेर काढणे दोष आहे का? म्हणून मी जिथे जिथे दिसले तिथे बोलत गेलो, असंही अण्णा हजारे म्हणाले. 

"प्रत्येक पक्षात समविचारी लोक असतात तसे आव्हाड आणि ते आहेत. ते समविचारी लोक आहेत. त्यांना दुसर काही दिसतच नाही, अंधारी डोळ्यासमोर आल्यासारख एकच दिसते. मी जर हवेत बोललो असतो तर शरद पवार यांचे मंत्री घरीच गेले नसते. मी आंदोलन केले म्हणून ते घरी गेले. मी अनेक पक्षाचे मंत्री घरी घालवले, असंही अण्णा हजारे म्हणाले. 

शरद पवारांची अण्णा हजारे यांच्यावर टीका

एका मुलाखतीमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले होते, 'माझ्याविरोधात ट्रकभर पुरावे असल्याचा दावा तत्कालीन उपायुक्त जी.आर. खैरनार आणि अण्णा हजारे यांनी केला होता. या आरोपांची चौकशीही झाली होती. मात्र, या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे पुराव्यांनीशी समोर आले होते. माझ्यावर आरोप करणारे खैरनार, अण्णा हजारे इतरांचे काय झाले? ते आज कुठे आहेत?, असंही शरद पवार म्हणाले.राज्यात पाच टप्प्यात मतदान

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यात मतदान पार पडले. महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार प्रचार केला आहे. आता ४ जूनला निकाल येणार असून या निकालावरुन अनेक नेते दावे करत आहेत. 

टॅग्स :अण्णा हजारेराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारलोकसभा निवडणूक २०२४