स्वच्छ मुंबईसाठी ‘सोशल’ प्रचार!, पालिकेची सोशल मीडियाद्वारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 07:24 AM2017-11-28T07:24:03+5:302017-11-28T07:24:30+5:30

‘जो दिखता है वही बिकता है,’ अशी एक म्हण आहे. कार्यापेक्षा त्याचा गवगवा केल्यानेच निम्मे काम फत्ते होते, असे आजचे वास्तव आहे. त्यामुळे हाच फंडा अवलंबून स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

 'Social' campaign for clean Mumbai, public awareness through municipal social media | स्वच्छ मुंबईसाठी ‘सोशल’ प्रचार!, पालिकेची सोशल मीडियाद्वारे जनजागृती

स्वच्छ मुंबईसाठी ‘सोशल’ प्रचार!, पालिकेची सोशल मीडियाद्वारे जनजागृती

Next

मुंबई : ‘जो दिखता है वही बिकता है,’ अशी एक म्हण आहे. कार्यापेक्षा त्याचा गवगवा केल्यानेच निम्मे काम फत्ते होते, असे आजचे वास्तव आहे. त्यामुळे हाच फंडा अवलंबून स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. केंद्र सरकारमार्फत गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात नवी मुंबई आणि पुण्यासारख्या छोट्या शहरांनी मुंबईला पाठी टाकले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेला हे शहाणपण सुचले आहे. त्यासाठी पालिकेने स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये स्वच्छता अभियान जाहीर केल्यानंतर संपूर्ण देशभर ही मोहीम सुरू आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीला दीडशे वर्ष २०१९ मध्ये पूर्ण होत आहे. त्यापूर्वी भारत देश स्वच्छ व हागणदारीमुक्त करण्याचा केंद्राचा निर्धार आहे.
मात्र, या मोहिमेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई शहर मागे पडले आहे. स्वच्छता सर्वेक्षणात २०१५ मध्ये १९व्या क्रमांकावर असलेले मुंबई शहर गेल्या वर्षी २९व्या क्रमांकापर्यंत घसरले. केलेले काम केंद्र सरकार व नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने, ही घसरण होत असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
अ‍ॅपद्वारे झालेल्या सर्वेक्षणात देशातील ४३४ शहरांनी सहभाग घेतला होता. मात्र, या सर्वेक्षणात दोन हजार गुणांपैकी दीडशे गुण मोबाइल अ‍ॅपसाठी राखीव होते.
कचरा उचलणे, घनकचरा व्यवस्थापन, शौचालयांचे बांधकाम आदी निकष निश्चित करण्यात
आले होते. त्याचबरोबर, स्वच्छतासंदर्भात अ‍ॅपवर आलेल्या नागरिकांच्या तक्रारींची दखल पालिका किती वेळेत घेते? याकडे केंद्राचे बारीक लक्ष होते. यामध्येच मागे राहिल्याने पालिका स्वच्छतेच्या परीक्षेत मागे राहिली, असे अधिकाºयांना वाटते. त्यामुळे सोशल मीडियावर स्वच्छतेचा गाजावाजा करण्याचे काम खासगी संस्थेला देण्यात येणार आहे.

टिष्ट्वटरवरून मदतीचे आवाहन

स्वच्छतेच्या सर्वेक्षणात मुंबईतील सव्वा कोटी जनतेपैकी केवळ पाच हजार नागरिकांनीच गेल्या वर्षी सहभाग घेतला होता. त्यामुळे पालिकेने या वेळेस मुंबईकरांना स्वच्छता सर्वेक्षणात मतदान करण्याचे आवाहन टिष्ट्वटरवरून सुरू केले आहे.

जास्तीतजास्त मुंबईकरांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वच्छ वॉर्डची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
मोबाइल अ‍ॅपचे १८ हजार ६७४ युजर्स एकट्या नवी मुंबईत आहेत. त्या पाठोपाठ पुण्यात ११ हजार ६७४ लोक हा अ‍ॅप वापरतात. मुंबईत मात्र, ही संख्या ९ हजार २५२ इतकीच आहे.

सोशल मीडियाद्वारे कोणतीही बातमी वेगाने पोहोचत असते. याचा फायदा आता महापालिकाही करून घेणार आहे. त्यामुळे या कामासाठी एका खासगी संस्थेला नेमून स्वच्छतेचा हायटेक संदेश देण्याची तयारी पालिकेने सुरू केला आहे.
 

Web Title:  'Social' campaign for clean Mumbai, public awareness through municipal social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई