Join us

धर्मादाय आयुक्तांची सामाजिक बांधिलकी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:09 AM

मुंबई : महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड व इतर जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे तसेच दरड कोसळल्याने अनेकांना आपले ...

मुंबई : महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड व इतर जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे तसेच दरड कोसळल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले आणि अनेक कुटुंबे बेघर झाली. पूरग्रस्तांचे अतोनात नुकसान झालेले आहे, शासन आपल्या परीने पूरग्रस्तांना मदत करीत आहे. पण, धर्मादाय आयुक्त प्र. श्रा. तरारे यांनी पुढाकार घेऊन राज्यातील सर्व धर्मादाय संस्थांना या कामी मदत करण्याचे आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून रुपये एक कोटीपेक्षा जास्तीची मदत जमा केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रुपये तेहतीस लाख साठ हजारांचा धनादेश मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खर्गे यांना धर्मादाय आयुक्त प्रमोद श्रावण तरारे यांनी सुपुर्द केला.

धर्मादाय आयुक्त विभागाच्या बांधिलकीचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. एका शासकीय विभागातून पूरग्रस्तांसाठी दाखविलेल्या संवेदनशीलतेसाठी हा विभाग नक्कीच कौतुकास पात्र आहे. येत्या काळात असेच स्तुत्य उपक्रम करण्याचा मानस प्र. श्रा. तरारे यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

---------------------------------------