मुंबई : व्यवसाय करताना कंपनी स्तरावरील दिग्गजांनी व्यवसायाबरोबर सामाजिक जबाबदारी आणि बांधिलकी जपली पाहिजे, असे प्रतिपादन परसिस्टेन्ट सिस्टम लिमिटेडचे एमडी आणि सीईओ डॉ. आनंद देशपांडे यांनी केले.बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे आयोजित लीडरशिप इन सोशल रिस्पॉसिबिलिटी समिट आणि ३९ वा बीएमए कॉर्पोरेट लीडरशिप अॅवॉर्ड २०१६-१७ सोहळा बुधवारी अंधेरी येथे पार पडला. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आनंद देशपांडे बोलत होते. या वेळी एल अॅण्ड टीचे अध्यक्ष ए.एम. नाईक यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.सोहळ्याला बीएमएचे अध्यक्ष एम.डी. अग्रवाल, बीएमएच्या सचिव छाया सेहगल, हरीभक्ती ग्रुपचे अध्यक्ष शैलेश हरीभक्ती, डेलॉईट हास्कीन अॅण्ड सेल्स एलएलपीचे अध्यक्ष पी.आर. रमेश, टीसीएसचे माजी उपाध्यक्ष एस. रामादुराई, ग्लोबल आॅईल अॅण्ड गॅसचे सल्लागार एम. डी. अग्रवाल उपस्थित होते. ‘लोकमत’ पुरस्कार सोहळ्याचे माध्यम प्रायोजक होते.एस्सेल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अश्विन श्रॉफ म्हणाले की, बीएमएच्या कार्यक्रमाचा सर्वांना फायदा होईल. निर्मया हेल्थ फाउंडेशनच्या संचालिका शुभलक्ष्मी पटवर्धन म्हणाल्या, आता लोक एकाच क्षेत्रात न राहता प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊ लागले आहेत. जिथे विकासाची गरज आहे तेथे सीएसआरचे पैसे जाऊ लागले आहेत. अवतार ग्रुपच्या संस्थापक सौंदर्या राजेश म्हणाल्या की, आम्ही शालेय शिक्षण घेणाºया आठवी ते बारावी इयत्तेत शिकणाºया मुलींना ४० प्रकारचे कौशल्य शिकवितो. मुलींना भविष्यात नोकरी निवडण्यासाठी या कौशल्यांचा उपयोग होतो. मुली या डेमोस्टिक लेबर इकोनॉमिकमधून बाहेर येऊन व्हाइट कॉलर इकोनॉमीमध्ये समाविष्ट होतात. देशाच्या जीडीपीसाठी हे महत्त्वाचे आहे. येस बँकेचे कार्यकारी उपप्रमुख अनुप गुरुवुगारी म्हणाले की, गुजरातमधील कच्छ येथे मीठ उत्पादन करणारे कामगार डिझेलच्या पंपावर काम करतात. त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. परंतु, येस बँकेने सोलार प्रकल्प उभारल्याने त्यांच्या कामात गती निर्माण झाली आहे. तसेच त्यांचे आरोग्य सुधारू लागले आहे.टीसीएस एम्बेडेट सिस्टम्स अॅण्ड रोबोटिक्सचे वैज्ञानिक संजय किंबहुने, रोटी बँकचे संस्थापक डी. शिवानंदन, बीएएसएफ इंडिया लिमिटेडचे प्रमख सुनीता सुळे, केअर नेक्स्ट इनोव्हेशन्सचे सहसंस्थापक शंतनू पाठक, टिसचे अध्यक्ष आणि प्राध्यापक सत्यजीत मजूमदार, जेबीआयएमएसचे संचालक सी.आर. चव्हाण, माँ फाउंडेशनचे सीईओ अमित मेहता, बँक आॅफ बडोदाचे अध्यक्ष रवी वेंकटेशन यांनीही उपस्थितांशी संवाद साधला.
सामाजिक बांधिलकी जपता आली पाहिजे - आनंद देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 2:46 AM