आरेच्या पालिका शिक्षकाची सामाजिक बांधिलकी; आदिवासी पाड्यांना केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 07:56 PM2020-04-01T19:56:54+5:302020-04-01T19:57:06+5:30
आरेतील पालिकेचे संगीत शिक्षक चारूहास दळवी यांनी सामाजिक बांधिलकी दाखवत येथील आदिवासी पाड्यांना सध्या ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत आहेत.
मनोहर कुंभेजकर
मुंबई--गोरेगाव(पूर्व) आरे कॉलनीत एकूण सत्तावीस आदिवासी पाडे आहेत.कोरोनाच्या संकटकाळात आरे कॉलनीतील आदिवासी तसेच इतर सर्व समाज घटकांना जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे.
आरेतील पालिकेचे संगीत शिक्षक चारूहास दळवी यांनी सामाजिक बांधिलकी दाखवत येथील आदिवासी पाड्यांना सध्या ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत आहेत.विशेष म्हणजे स्वतःचे वाहन वापरून आदिवासी पाड्यात सदर वाटप सुरू ठेवले आहे.लॉक डाऊन झाल्यापासून दळवी यांनी आरे कॉलनीच्या शाळेत शिकत असलेल्या पालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप ते करत आहेत.ते स्वतः तसेच त्यांना या सदर कामात चंदु मिठाई तसेेेच त्यांचे मित्र व अमेरिकेत असलेल्या त्यांचे नातेवाईक मदत करीत ते आहेत.
दळवी हे आरे कॉलनी शाळेत इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना संगीत हा विषय शिकवितात.येथील मराठी व तमिळ माध्यमाच्या प्रत्येकी दोन व हिंदी माध्यमाची एक अशा एकूण पाच शाळेतील विद्यार्थ्यांना संगीत हा विषय शिकवितात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांचे बर्याच विद्यार्थ्यांनी संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. काही जण संगीत विशारद ही परीक्षा पास होऊन शाळेत संगीत शिक्षक म्हणून नामांकित शाळेत काम करीत आहेत.
आरे कॉलनी खांबाचा पाडा,मरुशी पाडा तसेच येथील येथील युनिट नंबर ७ व १३ या बहुसंख्य तमिळ वस्ती असलेल्या भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.आज खांबाचा पाडा येथील आदिवासी बांधवांनी स्वतःची सुरक्षा पाळून सॊशल डिस्टनसिंगचे त्यांनी धडे दिले.तसेच येथील आदिवासी बांधवाना १० किलो गव्हाचे पिठ,४ किलो तांदूळ,१ किलो साखर,१ लिटर तेल,१ किलो तुरडाळ,१/४ किलो चहा,१ लाईफबॉय साबण यांचे वाटप देखिल केले.
येथील जोगेश्वरी विधानसभा मतदार संघाचे स्थानिक आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आम्हाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करावे असे मत येथील आदिवासीं बांधवांनी व्यक्त केले.