निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 05:48 AM2024-10-12T05:48:34+5:302024-10-12T05:49:53+5:30

सर्वांचे समाधान करण्याची राज्य सरकारची धडपड

social engineering in maharashtra assembly elections 2024 establishment of corporations for various societies | निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा

निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोशल इंजिनिअरिंग करत महायुती सरकारने विविध समाजासाठी तब्बल १७ महामंडळांची स्थापना केली आहेत. आतापर्यंत विशिष्ट समाजाच्या कल्याणासाठीच महामंडळे होती. लहान-लहान जातींकडून गेल्या काही वर्षांत महामंडळांची मागणी होत होती. त्यातील बहुतांश जाती ओबीसी, खुल्या प्रवर्गातील होत्या. ही मागणी पूर्ण करत मंत्रिमंडळाच्या गेल्या चार बैठकांमध्ये सर्वांचे समाधान करण्यात आले. 

ब्राह्मण व इतर खुल्या जातींसाठी अमृत ही संस्था आधीच स्थापन करण्यात आली होती. आता ब्राह्मण समाजाला स्वतंत्र महामंडळ दिले आहे. आतापर्यंत  महात्मा फुले महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ, श्यामराव पेजे महामंडळ,  अण्णा भाऊ साठे महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, चर्मोद्योग महामंडळ ही महामंडळे आहेत. नाभिक समाजासाठी संत सेना महाराज आर्थिक विकास महामंडळ २०१९ मध्येच स्थापन करण्यात आले होते; पण अद्याप त्याच्या कार्यालयाचाही पत्ता नाही. 

पत्रकारांनाही राज्य सरकारने खूश केले. पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी नागनाथ आण्णा नायकवडी महामंडळ स्थापन करण्यास मान्यता दिली.

गेल्या काही दिवसांत स्थापन करण्यात आलेली महामंडळे

समाजाचे नाव    महामंडळाचे नाव
१) लाडशाखीय वाणी, वाणी समाज : सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ     
२) लोहार समाज :  ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ
३) शिंपी समाज :  संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळ
४) गवळी समाज : श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ
५) लोहार समाज : अद्याप नाव निश्चित नाही
६) नाथपंथीय समाज : अद्याप नाव निश्चित नाही
७) लेवा पाटील, गुजर : अद्याप नाव निश्चित नाही
८) जैन समाज : जैन समाज आर्थिक विकास महामंडळ
९) बारी समाज : संत रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ
१०) तेली समाज : संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ
११) हिंदू खाटिक समाज : अद्याप नाव निश्चित नाही
१२) लोणारी समाज : अद्याप नाव निश्चित नाही
१३) मच्छीमार समाज : भूजलाशयीन मच्छिमार कल्याणकारी महामंडळ
१४) ब्राह्मण समाज     : परशुराम आर्थिक विकास महामंडळ
१५) राजपूत समाज     : वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ
१६) सोनार समाज : संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ
१७) आर्य  वैश्य समाज : श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ

 

Web Title: social engineering in maharashtra assembly elections 2024 establishment of corporations for various societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.