गौरीशंकर घाळे - मुंबई
विश्वासदर्शक ठरावाची वेळ अगदी जवळ येऊन ठेपल्यानंतरही भाजपा आणि शिवसेनेतील तिढा सुटण्याची चिन्हे नाहीत. याचे पडसाद सोशल मीडियातही उमटू लागले आहेत. एकेकाळी हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर काँग्रेस आघाडीवर तुटून पडणारे सोशल मीडियातील दोन्ही पक्षांचे समर्थक सध्या मात्र एकमेकांच्या विरोधात शड्ड ठोकून उभे आहेत.
‘सत्तेत आल्यापासून भाजपाचा सूर बदलला आहे’, ‘आपल्याच विचारांपासून भाजपा भरकटली’, ‘एकेकाळच्या आपल्या सहक:याशी वागवण्याची ही पद्धत नाही’, ‘राष्ट्रवादीसारख्या बेभरवशी साथीदारापेक्षा हिंदुत्ववादी शिवसेना बरी’, या मवाळ भूमिकेपासून ‘सत्तेमुळे भाजपावाल्यांना माज आल्या’ची जहाल भाषा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तसेच ज्या पक्षाला ‘भ्रष्टवादी’ म्हणून हिणवले त्याच पक्षाच्या पाठिंब्यावर शिवसेनेची अडवणूक केली जात आह़े शरद पवारांनी प्रचारात भाजपाला ‘चड्डी’वाले संबोधले त्यांच्या संगतीने हिंदुत्वाच्या भूमिकेला तिलांजली दिली जात असल्याचा ठपकाही ठेवला जात आहे.
तर ‘आताची शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना नव्हे’, ‘शिवसेनेला धडा शिकवायलाच हवा’, अशी भूमिका भाजपा समर्थक मांडताना दिसताहेत. ‘शिवसेनेने प्रचारात वापरलेली शिवराळ भाषा आणि थेट नरेंद्र मोदींवर केलेली टीका सध्याच्या परिस्थितीला कारणीभूत आहे’, ‘उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे नव्हेत. त्यांनी बदललेली परिस्थिती ध्यानात घ्यायला हवी’, ‘बाळासाहेब बेधडकपणो निर्णय घ्यायचे. त्यांची भूमिका बदलत नसे. उद्धव मात्र तीन आठवडे उलटसुलट व संभ्रम वाढवणारी भूमिका घेताहेत’, ‘आज शिवसेना नेते हिंदुत्वाची कढ घेत आहेत. मात्र भूतकाळात अनेकदा त्यांनी सोयीस्कर भूमिका घेतली होती. शिवसेनेने अनेकदा शरद पवारांची संगत केल्याची उदाहरणो आहेत. मग केवळ भाजपालाच का विरोध’, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला जात आहे. एकूणच सोशल मीडियावरही सध्या जोरदार चकमकी आणि खटके उडताना पाहायला मिळत आहे. (प्रतिनिधी)
च्‘सत्तेत आल्यापासून भाजपाचा सूर बदलला आहे’, ‘आपल्याच विचारांपासून भाजपा भरकटली’, ‘एकेकाळच्या आपल्या सहक:याशी वागवण्याची ही पद्धत नाही’, ‘राष्ट्रवादीसारख्या बेभरवशी साथीदारापेक्षा हिंदुत्ववादी शिवसेना बरी’, या मवाळ भूमिकेपासून ‘सत्तेमुळे भाजपावाल्यांना माज आल्या’ची भाषा पाहायला मिळत आहे.
च्तर ‘आताची शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना नव्हे’, ‘शिवसेनेला धडा शिकवायलाच हवा’, अशी भूमिका भाजपा समर्थक मांडताना दिसताहेत. ‘शिवसेनेने थेट नरेंद्र मोदींवर केलेली टीकाच सध्याच्या परिस्थितीला कारणीभूत आहे,’ असे बोलले जात आहे.