Join us

सोशल मीडियावर "लोकमत"चा बोलबाला

By admin | Published: April 12, 2017 2:28 PM

आलिया भट्ट आणि अमृता फडणवीस यांची गायनामधील जुगलबंदी, आर्ची उर्फ रिंकू राजगुरूने दिग्गज अभिनेते जितेंद्र यांच्यासोबत गाण्यावर धरलेला ठेका...

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.12 - संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर हा सोहळा मुंबईच्या स्टार सहारा हॉटेलमध्ये दिग्गजांच्या उपस्थितीत झोकात पार पडला. गुणिजनांचा गौरव करणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची दखल इतकी घेतली गेली की त्याचे स्वाभाविक पडसाद सोशल मीडियाच्या ट्रेन्ड्समध्ये उतरले. मंगळवारी संध्याकाळी हा सोहळा सुरू झाला आणि मान्यवरांचा गौरव करण्यात यायला लागला तसा #LokmatMaharashtrianOfTheYear हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये यायला लागला.
 उत्तरोत्तर तर हा हॅशटॅग दुसऱ्या क्रमांकावर स्थिरावला #LokmatMaharashtrianOfTheYear च्या पुढे स्वाभाविकपणे होता केवळ आयपीएलचा हॅशटॅग. हे झालं मुंबईच्या ट्रेन्ड्सबाबत, देशपातळीवरही #LokmatMaharashtrianOfTheYear हा हॅशटॅग चौथ्या क्रमांकावर होता.
 
युपीएएल प्रस्तुत व पॉवर्ड बाय कर्म आणि अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या सहकार्याने लोकमत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ चा सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. संध्याकाळी 5 वाजता हा सोहळा सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर लोकमतचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळाला. प्रेक्षकांनी तर या सोहळ्याला उदंड प्रतिसाद दिलाच शिवाय सोशल मीडियामधील अग्रगण्य असलेल्या ट्विटर आणि फेसबुकवर सेलिब्रिटींपासून तरूणाईसोबतच आबालवृद्धांपर्यंत लोकमतची क्रेझ पाहायला मिळाली.
 या सोहळ्यातील चर्चेतल्या घडामोडी- 
फेसबुक, ट्विटर, लोकमतची वेबसाईट आणि यूट्यूबवर या सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं. केवळ फेसबुकवरच लाखावर युजर्सपर्यंत हे लाईव्ह स्ट्रीमिंग पोचलं तर त्यातल्या तब्बल 36 हजार फॉलोअर्सनी साडेतीन तास चाललेल्या या सोहळ्याचा आनंद घेतला आणि आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या. पुरस्कारांखेरीज अभिनेत्री आलिया भट्ट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची गायनामधील जुगलबंदी, आर्ची उर्फ रिंकू राजगुरूने दिग्गज अभिनेते जितेंद्र यांच्यासोबत गाण्यावर धरलेला ठेका, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची आज तकच्या अॅंकर अंजना ओम कश्यप यांनी घेतलेली मुलाखत, त्यामध्ये त्यांनी कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवरून पाकिस्तानला सुनावलेले खडेबोल, अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टने कॅबिनेट मंत्रीपदांचं केलेलं खातेवाटप, जगातील सर्वात वजनदार इमान अहमद यांचं वजन घटवण्यासाठी डॉक्टर मुफज्जल लकडावाला यांनी केलेली खटाटोप आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची घेतलेली मुलाखत आदी विषय चांगलेच चर्चेत राहिले.
 
या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनीही ट्विट करून हा सोहळा लाखो लोकांपर्यंत पोहोचवला-  
 
 

सर्व विजेत्यांच्या माहितीसाठी क्लिक करा- lmoty.lokmat.com

वाचा आणखी बातम्या- 

(लोकमतने दिला होता माझ्या पहिल्या कवितेला पुरस्कार - नागराज मंजुळे)

(VIDEO - कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडू - राजनाथ सिंह)

(दाऊद इब्राहिम कराचीतच - राजनाथ सिंग)

(तुम्हाला माहितीये का....रणबीर आणि आलिया एकत्र करणार होते पदार्पण)

(मुंबईत उपचार घेत असलेल्या इमानचे घटले 262 किलो वजन)