...म्हणूनच मनसेचे नेते पक्ष सोडून जातात; राज ठाकरेंवर व्यंगचित्रातून वार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 02:19 PM2018-06-14T14:19:42+5:302018-06-14T14:21:53+5:30

सोशल मीडियाकडून राज ठाकरेंची खिल्ली

social media slams mns chief raj thackeray through cartoon over his caricature on modi government | ...म्हणूनच मनसेचे नेते पक्ष सोडून जातात; राज ठाकरेंवर व्यंगचित्रातून वार

...म्हणूनच मनसेचे नेते पक्ष सोडून जातात; राज ठाकरेंवर व्यंगचित्रातून वार

Next

मुंबई: सरकारी अधिकारपदांच्या संधी खासगी क्षेत्रातील व्यक्तींना खुल्या करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर काल राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून निशाणा साधला होता. राज ठाकरेंच्या या टीकेला आता सोशल मीडियावरुन जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. राज ठाकरे व्यंगचित्रं काढत बसतात, म्हणूनच त्यांचे नेते पक्ष सोडून जातात, असा खोचक टोला व्यंगचित्रातून राज ठाकरेंना लगावण्यात आला आहे. सध्या हे व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

सरकारी अधिकारी होण्यासाठी तरुण अनेक वर्ष मेहनत घेतात. मात्र आता मोदी सरकार खासगी क्षेत्रातील लोकांना संधी देऊन या तरुणांवर अन्याय करत आहे, अशा अर्थाचं व्यंगचित्र राज ठाकरेंनी रेखाटलं होतं. यामध्ये एक व्यक्ती अभ्यास करताना दाखवण्यात आली होती. तर खासगी क्षेत्रातील दुसरी व्यक्ती त्याच्या अंगावरुन उडी मारुन पुढे निघून जाताना दिसत होती. या व्यक्तीचं पंतप्रधान मोदी स्वागत करत असल्याचं व्यंगचित्र राज यांनी रेखाटलं होतं. या चित्रात मोदींसोबत भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि उद्योगपतीही दाखवण्यात आले होते.



राज ठाकरेंच्या याच व्यंगचित्राला प्रत्युत्तर देणारं व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 'बारामतीच्या बळावर' असं शीर्षक या व्यंगचित्राला देण्यात आलं आहे. यामध्ये राज ठाकरे व्यंगचित्र रेखाटताना दाखवण्यात आले आहेत. राज ठाकरे फक्त व्यंगचित्रात मग्न असल्यानं त्यांच्याकडे पक्षाकडे पाहायला वेळ नाही. त्यामुळे मनसेचे नेते पक्षाला रामराम करत आहेत, असं व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. 'हम व्यंगचित्र बनाते रहे, और लोग हमसे दूर जाते रहे,' अशी ओळ व्यंगचित्रातील राज यांच्या पाठीवर आहे. मनसेतून बाहेर पडणाऱ्या नेत्यांचं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वागत करत असल्याचं या चित्रात दिसतं आहे. उद्धव ठाकरेंच्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे असल्याचं व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. सध्या या व्यंगचित्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 
 

Web Title: social media slams mns chief raj thackeray through cartoon over his caricature on modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.