Join us

स्वाइनमुक्तीसाठी सोशल नेटवर्किंग

By admin | Published: March 02, 2015 10:43 PM

स्वाइनने राज्यात १४३ जणांचे बळी घेतले आहेत. संपूर्ण राज्यभर १६ हजार २२९ एवढे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३२५८ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

स्वाइनने राज्यात १४३ जणांचे बळी घेतले आहेत. संपूर्ण राज्यभर १६ हजार २२९ एवढे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३२५८ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. झपाट्याने पसरणाऱ्या या रोगावर नियंत्रणासाठी सरकारने शक्य ते प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी या रुग्णांवर मोफत उपचार करण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.वेगाने पसरत असलेल्या स्वाइन फ्लूने आपले आक्राळविक्राळ रूप धारण केलेले आहे. देश, राज्यभर या रोगाने अनेकांचा बळी घेतला असून संशयित रुग्णांची संख्याही वाढत चाललेली आहे. याला आळा घालण्याकरिता विविध स्तरावर जनजागृतीचे नवनवीन उपाय योजले जात असून नागरिकही त्याला प्रतिसाद देत आहेत. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची जनजागृतीची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून स्वाइनची माहिती पोहोचविली जात आहे. अवकाळी पावसाचा बसलेला फटका हा हे रोग पसरण्यासाठी पूरक ठरत आहे. यामुळे रोग आणखी पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. यासाठी नागरिकांना सतर्क करण्याचे आवाहन करण्याची गरज निर्माण झाली आहे.याकरिता जनजागृतीसाठी तरुणाई पुढे सरसावली आहे. विविध प्रकारे जनजागृतीचा प्रयत्न चालू असून आजाराची व्याप्ती, वेगाने होणारा प्रसार आणि घ्यावयाची काळजी याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅपमधून दिली जात आहे. स्वाइन फ्लू होतो कसा?च्हा (एच१एन१) विषाणूमुळे होणारा रोग आहे. हा आजार असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क आल्यास एकापासून दुसऱ्याला या आजाराची लागण होऊ शकते.लागण टाळण्यासाठी च्हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत, भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी, पौष्टिकआहार घ्यावा, रुग्णांसोबत संपर्काच्यावेळी स्वच्छ रुमाल अथवा मास्क वापरा, दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यावे, लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपचार घेणे टाळावे.स्वाइनची लक्षणे च्ताप, खोकला, घशाची खवखव, नाक गळणे किंवा चोंदणे, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, थंडी, डायरिया, उलट्या होणे.भीती दूर सारणे आवश्यकविशेष म्हणजे या रोगाबद्दल वाढत चाललेल्या भीती दूर करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. स्वाइन फ्लूवर औषध उपलब्ध असल्याने हा रोग बरा होणारा आहे, त्यामुळे एच१एन१ या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींनी घाबरण्याचे कारण नाही. शक्यतो सार्वजनिक ठिकाणावरून जाताना मास्क वापरावे. उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे, विशेष म्हणजे लहान मुलांना सार्वजनिक ठिकाणी सोबत घेवून जाणे टाळावे, लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने एच१एन१ विषाणू ची लागण झाल्यास ते लहानग्यांच्या जीवावर उठू शकते.- रुपेश पाटील, सुकापूर, पनवेल.डॉक्टरांचा सल्ला घ्या!स्वाइन फ्लू या आजाराने राज्यभर थैमान घातल्याच्या बातम्या सध्या बघायला, ऐकायला मिळत आहेत, मात्र या रोगाबाबत घाबरण्याचे कारण नाही माझ्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना याबाबत सतर्क करत असतो. त्यांना या रोगाबद्दल सविस्तर माहिती देवून जनजागृती करतो. स्वाइन फ्लूबाबत जनजागृती करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून देशाचे नागरिक म्हणून प्रत्येकाने याबाबत पुढाकार घेणे गरजेचे आहे. - जयेश पाटील, खारघर गावथंड वातावरण चिंतेची बाब!सध्या पसरलेल्या स्वाइन फ्लूबाबत अधिकाधिक माहिती जाणून घेणे आवश्यक बनलेले आहे. या रोगाबाबत पसरणाऱ्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहील यासाठी आपणच खबरदारी घ्यावी. बाहेर न पडणेच शक्यतो आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. जनजागृतीसाठी मित्रमंडळी, नातेवाइकांना या रोगाबाबत माहिती द्यावी.- समाधान धरणेकर, खारघर.‘स्वाइन अवेरनेस’सध्या तरुणाई सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव असते. फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅपवर विविध प्रकारचे सामाजिक विषय उचलून त्याबाबत एक मोहीम सुरू केली जाते. माझ्या मित्रांच्या मदतीने मी याबाबत कार्य करीत आहे. व्हॉट्सअ‍ॅप व फेसबूकवर ग्रुप तयार करुन त्याला (स्वाइन फ्लू अवेरनेस) असे नाव दिले आहे. या ग्रुपला चांगला प्रतिसाद मिळत असून नेटीझन्सनी याबाबत पुढाकार घ्यावा.- सिध्दार्थ महादे, पिसार्वे गाव, तळोजा.