२० आॅगस्टपासून सामाजिक ऐक्य पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 05:18 AM2017-08-16T05:18:31+5:302017-08-16T05:18:31+5:30
विविध धर्मातील नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना दृढ होण्यासाठी राज्यात २० आॅगस्टपासून सामाजिक ऐक्य पंधरवडा आयोजित करण्यात आला
Next
मुंबई : विविध धर्मातील नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना दृढ होण्यासाठी राज्यात २० आॅगस्टपासून सामाजिक ऐक्य पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. अल्पसंख्याक विकास विभागाकडून पाच सप्टेंबरपर्यत चालणाºया या उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालये, मुख्यालयामध्ये सर्वधर्म प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती दिनानिमित्य दरवर्षी देशभरात २० आॅगस्टला सदभावना दिन व त्यापुढील १५ दिवस हे सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरे केले जातात. त्यानुसार यावर्षीही २० आॅगस्टपासून राज्यभरात समूहगान व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.