ईशान्य मुंबईत आरोप-प्रत्यारोपांत रंगले सोशल युद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 01:54 AM2019-04-26T01:54:41+5:302019-04-26T01:55:58+5:30
लोकमत रिसर्च : तरुणाईला आकर्षित करण्यासाठी विविध व्हिडीओंचा आधार...
मुंबई : उत्तर पूर्व मुंबईत युती- आघाडीच्या उमेदवारामध्ये आरोप प्रत्यारोपांत सोशल युद्ध रंगलेले दिसून येत आहे. त्यातही, रोजगार, शिक्षण, उद्योग, सुखकर रस्ते, पुनर्विकासाच्या मुद्यावर ते मतदारांपर्यंत पोहचताना दिसत आहेत. निवडणूक जाहीर झाल्यापासून आजतागायत महाआघाडीचे उमेदवार संजय पाटील आणि महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांचे सोशल मीडियावरही प्रचार रंगत आहेत. यात, दिवसभाराच्या दिनक्रमाबरोबर शक्तिप्रदर्शनाचे व्हिडीओ, तसेच वचननामाही प्रसिद्ध केले जात आहे. त्यात, केलेला कामाची चित्रफितही प्रसिद्ध करण्यात येत आहे.
प्रमुख उमेदवार संजय पाटील - राष्ट्रवादी
फेसबुक 18112 पेज लाइक्स
पोस्ट सरासरी निवडणूक जाहीर झाल्यापासून दर दिवशी पोस्ट - 6
ट्विटर ३०० फॉलोअर्स
पोस्ट सरासरी निवडणूक जाहीर झाल्यापासून दर दिवशी पोस्ट - 5
मनोज कोटक - भाजप
फेसबुक 36420 पेज लाइक्स
ट्विटर 2133 फॉलोअर्स
पोस्ट सरासरी निवडणूक जाहीर झाल्यापासून दर दिवशी पोस्ट - 6
पोस्ट सरासरी निवडणूक जाहीर झाल्यापासून दर दिवशी पोस्ट - 1
संजय पाटील - कोणत्या मुद्द्यांवर भर
नोकरी, समान शिक्षण संधी, उद्योजकांना ३ वर्ष कुठलीही परवानगी न घेता संधी,.पुनर्विकास
भाजप सरकारने आतापर्यंत काहीच केले नाही. हे दर्शविण्याचा प्रयत्न
मनोज कोटक - कोणत्या मुद्द्यांवर भर
रेल्वे,मेट्रो, रस्ते वाहतूक सुधारणा, नागरी सुविधा, महिला सक्षमीकरणावर, विकास अधिक भर
नरेंद्र मोदींनी केलेल्या कामावर अधिक भर, पुन्हा एकदा मोदी सरकारचा नारा.