समाज कार्य आत्मानंद देते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:07 AM2020-12-29T04:07:23+5:302020-12-29T04:07:23+5:30

डॉ.स्मिता रणजीत काळे यांचा गौरव लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कुठल्या पदासाठी, पैशासाठी अथवा मान सन्मानासाठी केलेल्या कार्यापेक्षा स्वान्तसुखाय ...

Social work gives pleasure | समाज कार्य आत्मानंद देते

समाज कार्य आत्मानंद देते

Next

डॉ.स्मिता रणजीत काळे यांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कुठल्या पदासाठी, पैशासाठी अथवा मान सन्मानासाठी केलेल्या कार्यापेक्षा स्वान्तसुखाय केलेले समाज कार्य आत्मानंद देते. कोरोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही. त्यामुळे मनुष्यसेवा ही ईश्वरसेवा मानून आरोग्यसेवकांनी या पुढेही आपले सेवाकार्य सुरूच ठेवावे असे, आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी वैद्यकीय क्षेत्रातील कोरोना योद्ध्यांना केले. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के इतके आहे. हे कार्य साध्य करणाऱ्या कोरोना वीर व वीरनारींच्या कार्याची दखल इतिहास निश्चितपणे घेईल, असे राज्यपाल म्हणाले.

महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीतर्फे राजभवन येथे आयोजित कोरोना वीरांच्या सन्मान सोहळ्यात भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. राज्यपालांच्या हस्ते डॉक्टर्स, दंतवैद्य, विशेषज्ञ, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ यांसह खासगी आरोग्य क्षेत्रातील ५० कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्यात आला.

भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, मनुष्यसेवा ही साक्षात परमेश्वराची सेवा आहे. ही सेवा करण्याचे भाग्य वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लाभले. देशातील खासगी डॉक्टरांनी व इतर आरोग्यसेवकांनी या संकटप्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोग्यसेवा दिल्यामुळेच भारतातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक आहे.

यावेळी महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे निमंत्रक डॉ.अजित गोपछडे, मुंबई प्रदेश निमंत्रक डॉ.स्मिता काळे, डॉ.राजकुमार त्रिपाठी, डॉ.पूनम तिवारी, डॉ.विनय थाटी, डॉ.विक्रम खन्ना आणि मुंबई व महाराष्ट्रातील विविध भागांतील कोरोना वीर आदींचा गौरव करण्यात आला.

Web Title: Social work gives pleasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.