Join us

सोसायट्यांनो, एक दिवस ‘कोरडा’ पाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 2:40 AM

साथीच्या आजारांचा धोका; महापालिकेच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद द्या

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत असतानाच साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. अनेकवेळा दूषित पाण्याचा पुरवठा, उघड्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन, दूषित पाण्यातून प्रवास केल्यानंतर घेण्यात न आलेली काळजी; अशा अनेक घटकांमुळे साथीच्या आजाराची लागण होते. विशेषत: पाणी साचत असलेल्या परिसरात डेंग्यू, मलेरियासारखे आजार पसरण्याची भीती असल्याने मुंबई पालिकेने मुंबईकरांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: मुलुंडमध्ये एका ३२ वर्षीय व्यक्तीचा डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतर पालिका सजग झाली असून, साथीच्या आजाराबाबत जनजागृती करण्यात येत असताना मुंबईतील सोसायट्यांना एक दिवस ‘कोरडा’ पाळण्याचे आवाहन केले जात आहे.

मुलुंड परिसरातील सोसायटीतील रहिवाशांना त्यांच्या स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करता यावी, म्हणून सोसायटीतील सर्व सदस्यांसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यात सुमारे १५ सदस्य उपस्थित होते. केवळ मुलुंड नाही, तर शक्य त्या माध्यमातून पालिका साथीच्या आजाराबाबत जनजागृती करत असून, काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. डेंगी, मलेरियाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी महापालिका सर्वस्तरीय प्रयत्न सातत्याने करीत असते. या अंतर्गत डेंगी-मलेरियाचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती ही साचलेल्या पाण्यातच होते. हे लक्षात घेऊन आपल्या घरातघराशेजारच्या परिसरात आणि कार्यालयात व कार्यालयाशेजारच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.डासाची मादी तीन वेळा अंडी घालते : डासांचे आयुष्य तीन ते सहा आठवड्यांचे असते. या आयुष्यात डासाची मादी साधारणपणे तीन वेळा अंडी घालते. प्रत्येक वेळी साधारणपणे ८० ते १०० अंडी घातली जातात. ही अंडी शुष्क अवस्थेतही साधारणपणे वर्षभरापर्यंत राहू शकतात. पाण्याशी संपर्क आल्यानंतर ही अंडी फलित होऊ शकतात.अंडी घालण्यासाठी चमचाभर पाणीही पुरेमलेरिया व डेंगी पसरवित असलेल्या डासाची मादी ही आपली अंडी स्वच्छ व साचलेल्या पाण्यातच घालते. ही अंडी घालण्यासाठी चमचाभर साचलेले पाणीही पुरेसे असते. अंडी घातल्यापासून साधारणपणे आठवड्याभरात डासांची उत्पत्ती होते. हे लक्षात घेऊन आपल्या घरात व घराशेजारच्या परिसरात आणि कार्यालयात व कार्यालयाशेजारच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.साचलेले पाणी तत्काळ नष्ट करा!1थेंबभर पाणी साचलेलेआढळले, तरीदेखीलतत्काळ नष्ट करा.2साचलेल्या पाण्यात डासाच्या मादीने अंडी घातल्यास त्यातूनडास उत्पन्न होण्यास साधारणपणे आठवड्याभराचा कालावधी लागतो.3दर आठवड्यातून एकदिवस आपल्यासोसायटीच्या व जवळपासच्या परिसराची नियमितपणे तपासणी करा.4पाणी साठविण्याची भांडी, टाक्या आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरड्या ठेवून ‘कोरडा दिवस’ पाळावा.5पालिकेच्या आवाहनास अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद द्या.डासांची अंडी नष्ट करापिंप, ड्रम, बादल्यांमधील पाणी सात दिवसांतून किमान एक वेळा पूर्णपणे बदला. आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा पाळा. पाणी साठविण्याची भांडी कोरडी ठेवून ती कोरड्या फडक्याने पुसून घ्या. जेणेकरून भांड्यांच्या कडांना चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील.सोसायटीच्या परिसरात तपासणीजानेवारी ते २० जुलैदरम्यान महापालिकेच्या चमूंद्वारे ६८ लाख ८१ हजार ६८६ घरांची संयुक्त पद्धतीने तपासणी करण्यात आली.तपासणीत इमारत/ सोसायटी परिसरात18,420ठिकाणी डेंगी विषाणूंचा प्रसार करणाºया एडिस एजिप्टाय डासांची उत्पत्तीस्थळे आढळून आली.3,752ठिकाणी एॅनाफिलीस या मलेरियाचा प्रसार करणाºया डासांची उत्पत्तीस्थळे आढळून आली.डास मादी का चावते?फुलांचे परागकण, फळे वा इतर शर्करा असणारे पदार्थ हेनर डासांचे प्रमुख अन्न मानले जाते. तर रक्त हे मादी डासांचेअन्न असते. त्यामधील प्रथिनांची अंडी तयार होण्याकरिता आवश्यकता असते. या प्रथिनांसाठी डासाची मादीमानवाला चावते.डेंग्यू आणि हिवतापबाटलीचे झाकण, टायर, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, वातानुकूलन यंत्रणा, रेफ्रिजरेटरचा डिफ्रॉस्ट ट्रे, रिकामी शहाळी, रोपे-कुंड्यांखालील ताटल्या यासारख्या वस्तूंमध्ये साचलेल्या काही थेंब पाण्यातही उत्पन्न होणारे डास हे डेंगी, हिवताप यासारख्या रोगांच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरतात.कोणती डासाची मादी केव्हा चावते?मलेरिया, डेंगी यासारख्या रोगांचे परजीवी/विषाणू हे डासांच्या शरीरात असू शकतात. परजीवी/विषाणू वाहक असणारी डासाची मादी मानवाला चावल्यास त्या रोगांचे मानवात संक्रमण होते. डेंगीचे संक्रमण करणारी डासाची मादी ही मानवाला साधारणपणे दिवसा चावते तर मलेरियाचे संक्रमण करणारी डासाची मादी ही बहुतांशी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान चावते. 

टॅग्स :मुंबईघर