सोफिया रोबो मुंबईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:32 AM2017-12-28T02:32:20+5:302017-12-28T02:32:24+5:30
मुंबई : सौदी अरेबियाने नागरिकत्व दिलेली सोफिया रोबो मुंबई भेटीला येणार आहे.
मुंबई : सौदी अरेबियाने नागरिकत्व दिलेली सोफिया रोबो मुंबई भेटीला येणार आहे. मुंबई भेटीत ही रोबो आयआयटीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे़ येत्या ३० डिसेंबरला तिचा हा दौरा आहे़ नागरिकत्व मिळालेली सोफीया रोबो कशी आहे, हे पाहण्यासाठी सर्व विद्यार्थी उत्सुक आहेत़ महत्त्वाचे म्हणजे, सोफीया रोबोट बनविण्यापासून तिला नागरिकत्व मिळण्यापर्यंतची जीवनगाथा तिला बनविणारे डॉ. डेव्हिड हंसन हे विद्यार्थ्यांना सांगणार आहेत.
आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी सोफीया रोबोटला मुंबईत आणण्यासाठी डॉ. हंसन यांच्याशी जून महिन्यापासून संपर्क साधला होता. सोफीया कोणत्या विषयावर प्रेक्षकांशी संवाद साधणार हे अद्याप ठरलेले नाही. तिला पाहण्यासाठी देशभरातील विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत.
आयआयटीमध्ये रोबोचे सादरीकरण दरवर्षी होते. जगभरातील वैज्ञानिक आपले विविध संशोधन येथे सादर करतात. बीना ४२, मानवी स्वभावाचे वाचन, मंगळावरील
यान यांसारखे विविध प्रसिद्ध
रोबोट्स मुंबईकरांना पाहायला मिळाले आहेत.
>सोफीया कोणत्या विषयावर प्रेक्षकांशी संवाद साधणार हे अद्याप ठरलेले नाही. तिला पाहण्यासाठी देशभरातील विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. आयआयटीमध्ये रोबोचे सादरीकरण दरवर्षी होते.