सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी साक्षीदाराची उच्च न्यायालयात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:19 AM2018-12-14T01:19:01+5:302018-12-14T01:19:20+5:30

निकालाला स्थगिती देण्याची मागणी; महत्त्वाच्या साक्षी न घेता खटला संपविल्याचा दावा

Sohrabuddin fake encounter case witnesses plea in High Court | सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी साक्षीदाराची उच्च न्यायालयात याचिका

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी साक्षीदाराची उच्च न्यायालयात याचिका

googlenewsNext

मुंबई : सोहराबुद्दीन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणाचा निकाल विशेष न्यायालय २१ डिसेंबर रोजी देण्याची अपेक्षा असताना, या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या प्रकरणातील सरकारी पक्षाच्या साक्षीदाराने या निकालाला स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

रिझवाना खान आणि त्यांचा पती आझम खान या केसमध्ये सरकारी वकिलांचे साक्षीदार आहेत. रिझवाना यांनी त्यांच्या पतीच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अनेक महत्त्वाच्या साक्षीदारांच्या साक्षी न नोंदविता घाईघाईने हा खटला संपविण्यात आला आणि निकाल राखून ठेवला. यामुळे खटल्याला हानी पोहचेल आणि गुन्हेगारांना शिक्षा होणार नाही, असे रिझवाना यांनी याचिकेत म्हटले आहे. आरोपींच्या सोयीने साक्ष देण्यासाठी आपल्यावर व आपल्या कुटुंबियांवर दबाव आणण्यात आला होता, असा आरोप त्यांनी ठेवला आहे.

न्यायालयाला विनंती
आता आपल्या पतीने खरे सांगण्याचे धाडस केले आहे. तो पुन्हा न्यायालयात साक्ष देण्यासाठी तयार आहे. त्याची साक्ष नोंदविण्यात यावी, अशी विनंती रिझवाना यांनी न्यायालयाला केली आहे.

माझ्याही हत्येचा कट रचण्यात आला...
आझम खान याने ३ नोव्हेंबर रोजी न्यायालयात साक्ष नोंदविली. सोहराबुद्दीन शेख ज्या गँगमध्ये सामील होता, त्याच गँगचा मी सदस्य होतो, अशी साक्ष खान यांनी न्यायालयात दिली. शेखच्या आदेशानुसारच तुलसीराम प्रजापतीने २००३ मध्ये गुजरातचे तत्कालीन गृहमंत्री हरेन पांड्या यांची हत्या केली, अशीही माहिती खानने न्यायालयाला दिली. अभय चुंदासमा, डी. जी. वंजारा आणि अन्य अधिकाऱ्यांचे म्हणणे मान्य करण्यास शेखने नकार दिल्याने त्याच्या हत्येचा कट रचण्यात आला. यामध्ये गुजरात व राजस्थान पोलीस अधिकाºयांसह राजकीय नेत्यांचाही समावेश आहे, असे रिझवानाने याचिकेत म्हटले आहे.

Web Title: Sohrabuddin fake encounter case witnesses plea in High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.