सातपाटीमध्ये चो-यांचा सुकाळ

By admin | Published: March 15, 2015 10:36 PM2015-03-15T22:36:22+5:302015-03-15T22:36:22+5:30

सातपाटीमध्ये चोऱ्यांत घटनेत वाढ होत असून तकदीर मित्र मंडळाजवळील एका तरूणीच्या गळ्यातील सोन्याची चेन काल रात्री चोरट्यांनी चोरून नेली.

Sokal | सातपाटीमध्ये चो-यांचा सुकाळ

सातपाटीमध्ये चो-यांचा सुकाळ

Next

पालघर : सातपाटीमध्ये चोऱ्यांत घटनेत वाढ होत असून तकदीर मित्र मंडळाजवळील एका तरूणीच्या गळ्यातील सोन्याची चेन काल रात्री चोरट्यांनी चोरून नेली. त्यामुळे तरूणांनी चोरट्यांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या टिम बनविल्या असल्या तरी गैरसमजातून एका पाहुण्याला चोर समजून चोप बसता बसता राहिला. या प्रकरणी कुणीही कायदा हातात न घेता संशयीताला पोलिसांच्या स्वाधीन करावे असे आवाहन सहा. पो. नि. भुजंग हातमोडे यांनी केले.
सातपाटीमध्ये मागील वर्षभरापासून चोरीच्या घटनेत वाढ होत असून या चोरीप्रकरणात स्थानिक तरूणांचा सहभाग गावासाठी चिंतेचा विषय बनला आहे. काल रात्रौ सातपाटी मधील तकदीर मित्र मंडहात राहणाऱ्या कृतीका तांडेल (१९) ही आपल्या घरात झोपली असताना खिडकीतून हात घालून चोरट्यानी तिच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळ काढला. तर शेजारी राहणाऱ्या कांचन चौधरी यांच्या घरातही प्रवेश करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानाने फसला. त्यामुळे गावात या चोरट्यांना पकडण्यासाठी तरूणांन टीम बनविल्या असून रात्रौ आळीपाळीने गस्त घालून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. परंतु या चोरट्यांना पकडण्याच्या प्रयत्नात अनेक अफवा पसरविल्या जात असून या अफवेमधून मुंबईतून आपल्या सातपाटीतील नातेवाईकांडे पाहुणा म्हणून आलेल्या एका तरूणाला चोर समजून जमावाने बेदम मारहाण करण्याचा प्रयत्न काही जागृत नागरीकांमुळे टळला. वसई तालुक्यातही चोरट्याला मारहाण केल्यानंतर पोलिसांनी दोन लोकांना अटक केली आहे. या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीसांनी रात्रीची गस्त वाढविली असून लोकांना कुणा संशयिताचा संशय आल्यास त्याला पोलीसांच्या स्वाधीन करावे, कुणीही कायदा हातात घेऊन नये असे आवाहन सातपाटी सागरी पो. स्टे. चे सहा. पो. नि. हातमोडे यांनी केले.

Web Title: Sokal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.