खंडित पुरवठ्यासह तांत्रिक बिघाडावर सौर कृषिपंपाचा उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 06:26 AM2018-10-21T06:26:54+5:302018-10-21T06:26:55+5:30
कृषिपंप ग्राहकांच्या वीजपुरवठ्यासाठीच्या लघुदाब वाहिनीची लांबी वाढती असून, यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा, वीजपुरवठा खंडित होणे, वारंवार बिघाड होणे, तांत्रिक वीज हानी होणे या घटना घडतात.
मुंबई : कृषिपंप ग्राहकांच्या वीजपुरवठ्यासाठीच्या लघुदाब वाहिनीची लांबी वाढती असून, यामुळे कमी दाबाने वीजपुरवठा, वीजपुरवठा खंडित होणे, वारंवार बिघाड होणे, तांत्रिक वीज हानी होणे या घटना घडतात. परिणामी, हे टाळण्यासाठी सौर कृषिपंप योजना अंमलात येत असून, या अंतर्गत एक लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकºयांना दिवसा वीज पुरवण्याचे स्वप्न साकारले जाणार आहे.
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत शेतकºयांसाठी एक लाख सौर कृषिपंपांची योजना तीन वर्षांत राबविण्यात येणार आहे. परिणामी, एक लाख शेतकºयांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून, शेतकºयांना दिवसा वीज पुरविण्याचे स्वप्न साकारले जाणार आहे. योजनेसाठी शासन तीन वर्षांत ८५८.७५ कोटी रुपये खर्च करणार आहे. एक लाख सौर कृषिपंपांच्या योजनेला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१ अशा तीन वर्षांत ही योजना राबविली जाणार असून, पहिल्या वर्षी २५ हजार, दुसºया वर्षी ५० हजार आणि तिसºया वर्षी २५ हजार प्रमाणे शेतकºयांना एक लाख कृषिपंपांचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकºयाकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे, असे शेतकरी पात्र राहणार आहेत. तसेच अशा शेतकºयाकडे पारंपरिक पद्धतीने वीज जोडणी झालेली नसणे आवश्यक आहे.
>सवलतीच्या वीजदरासाठी महावितरणला अनुदान
शेतकºयांस वीजदरासाठी जी सवलत देण्यात येते; त्या सवलतीच्या वीज दरापोटी शासनाकडून महावितरणला अनुदान देण्यात येते. सन २०१७-१८ या वर्षी अशाप्रकारे महावितरणला शासनाकडून ४ हजार ८७० कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे.