मुंबई : भारतातील सर्वांत मोठ्या ग्रीड-सिंक्रोनाइज्ड, बिहाइंड-द-मीटर कारपोर्ट म्हणजेच सौर कारपोर्टमध्ये दरवर्षी ८६.४ लाख केडब्ल्यूएच वीज तयार होणार असून, यामुळे दरवर्षी ७ हजार टन आणि संपूर्ण कार्यकालावधीत १.६ लाख टन कार्बन उत्सर्जन रोखण्यात मदत मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.
६.२ एमडब्ल्यूपी क्षमतेच्या सौर कारपोर्टमध्ये दरवर्षी ८६.४ लाख केडब्ल्यूएच वीज तयार केली जाईल. यामुळे दरवर्षी ७ हजार टन आणि संपूर्ण कार्यकालावधीत १.६ लाख टन कार्बन उत्सर्जन रोखण्यास मदत मिळेल. ३० हजार चौरस मीटर्स क्षेत्र असलेल्या कारपोर्टमध्ये हरित ऊर्जा निर्मिती केली जाण्याच्या बरोबरीनेच प्लांटमध्ये बनून तयार असलेल्या गाड्यांसाठी कव्हर्ड पार्किंगसाठी देखील याचा उपयोग केला जाईल.
२०३९ पर्यंत कार्बन उत्सर्जनाचे निव्वळ प्रमाण शून्यापर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट म्हणून ३१ ऑगस्ट २०२० रोजी वीज खरेदी करार (पीपीए) करण्यात आला आहे. हे विशाल कारपोर्ट फक्त साडेनऊ महिन्यांच्या कालावधीत विकसित केले गेले आहे, अशी माहिती टाटा पॉवर या वीज कंपनीकडून देण्यात आली.
------------------
२०२० मध्ये एकूण ऊर्जा वापराच्या २१ % म्हणजेच ८८.७१ मिलियन केडब्ल्यूएच शुद्ध ऊर्जा निर्मिती केली.
२०१९ मधील ऊर्जा वापराच्या तुलनेत १६% पेक्षा जास्त हे प्रमाण आहे. त्यामुळे ७२७३९ मेट्रिक टन इतके कार्बन उत्सर्जन रोखण्यात मदत मिळाली.
२०३० पर्यंत १०० % शुद्ध ऊर्जा वापराची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अक्षय ऊर्जा निर्मितीचे प्रयत्न अधिक जोमाने करण्याची योजना आहे.