भांडुपच्या सह्याद्री विद्यामंदिरात सौरऊर्जा प्रकल्प

By admin | Published: June 29, 2017 03:11 AM2017-06-29T03:11:19+5:302017-06-29T03:11:19+5:30

भांडुप येथील सह्याद्री विद्याप्रसारक संस्थेच्या सह्याद्री विद्यामंदिरात नुकतेच के.व्ही. सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

Solar Power Project in Sahyadri Vidyamandir, Bhandup | भांडुपच्या सह्याद्री विद्यामंदिरात सौरऊर्जा प्रकल्प

भांडुपच्या सह्याद्री विद्यामंदिरात सौरऊर्जा प्रकल्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: भांडुप येथील सह्याद्री विद्याप्रसारक संस्थेच्या सह्याद्री विद्यामंदिरात नुकतेच के.व्ही. सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
करण्यात आले. भांडुप परिसरामध्ये सौरऊर्जा प्रकल्प असणारी ही एकमेव संस्था असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला स्थानिक आमदार अशोक पाटील, संस्थेचे अध्यक्ष भास्कर राणे, उपाध्यक्ष रामराव सुर्वे, सचिव जगन्नाथ आंबरे, खजिनदार रामचंद्र वारणकर आणि विश्वस्त अरूण राणे, प्रदीप वारणकर, संजय पवार यांची उपस्थिती होती.
आमदार अशोक पाटील यावेळी म्हणाले, केंद्र सरकारने राबविलेल्या वीजबचत योजनेंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचे श्रेय भांडुपमध्ये प्रथमत: सह्याद्री विद्या प्रसारक संस्थेला जाते. आमदार पाटील यांच्या प्रयत्नातून म्हाडाच्या माध्यमातून शाळेचा तळमजला, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील शौचालयाचे नुतनीकरण देखील करण्यात आले. या शौचालयांचे उद्घाटनही याप्रसंगी करण्यात आले.

Web Title: Solar Power Project in Sahyadri Vidyamandir, Bhandup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.