ऊर्जा निर्माण आणि आर्थिक बचतीची माहिती देण्यासाठी आता सोलारूफ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:06 AM2021-02-26T04:06:52+5:302021-02-26T04:06:52+5:30

मुंबई : घर, कार्यालय, संस्था आणि उद्योगधंद्यांमध्ये ऊर्जाविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी चिरस्थायी, पर्यावरणस्नेही आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर सुविधा म्हणून सौरऊर्जा ...

Solarroof campaign now to inform energy generation and economic savings | ऊर्जा निर्माण आणि आर्थिक बचतीची माहिती देण्यासाठी आता सोलारूफ अभियान

ऊर्जा निर्माण आणि आर्थिक बचतीची माहिती देण्यासाठी आता सोलारूफ अभियान

Next

मुंबई : घर, कार्यालय, संस्था आणि उद्योगधंद्यांमध्ये ऊर्जाविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी चिरस्थायी, पर्यावरणस्नेही आणि आर्थिकदृष्ट्या किफायतशीर सुविधा म्हणून सौरऊर्जा वापरण्याच्या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यात येत आहे. निमित्त आहे ते टाटा पॉवरच्या सोलारूफ - कमाई वाढवेल, मित्र बनवेल या अभियानाचे.

ग्राहकांनी पर्यावरणस्नेही ऊर्जा सेवासुविधांचा अवलंब करावा यासाठी त्यांना प्रेरित करण्यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने हे किती निकडीचे आहे आणि त्यापासून मिळणारे व्यापारी लाभ यावर विशेष भर यात देण्यात आला आहे. हरित ऊर्जा सुविधांचा वापर केला जाण्याला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला अनुसरून निवासी, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम, लघु, मध्यम उद्योग, व्यापारी, औद्योगिक कारखाने अशा विविध श्रेणींतील ग्राहकांच्या विविध प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कस्टमायझेबल अर्थात ग्राहकांच्या गरजांनुसार उपयोगात आणता येतील, अशा सुविधा तयार केल्या असून, ३१ शहरांमध्ये सोलारूफ अभियानामार्फत संदेश पसरवला जाईल. रूफटॉप सोलार सुविधा २६ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध आहे.

Web Title: Solarroof campaign now to inform energy generation and economic savings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.