लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : व्हॉट्सॲपवरून स्वस्तात रेमडेसिविर इंजेक्शन देत असल्याचा संदेश व्हायरल करून सावज जाळ्यात अडकताच बनावट रेमडेसिविरचे पार्सल पोहोचविणाऱ्या रूपेश गुप्ताला पालघरमधून अटक करण्यात आली. टिळकनगर पोलिसांनी तपासाअंती अवघ्या २४ तासांत त्याला बेड्या ठोकल्या. त्याने आतापर्यंत २९ गरजूंना बनावट रेमडेसिविर विकल्याची माहिती समोर आली आहे.टिळकनगर परिसरात राहणाऱ्या मेघना हितेश ठक्कर (वय ३८) यांच्या नातेवाईक असलेल्या चेतन मिस्त्री यांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असल्याने त्यांनी पंकज कोटक यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी व्हाॅट्सअपवरील गुप्ताचा संदेश पाठविला. त्यानुसार त्यांनी गुप्ताशी संपर्क साधून इंजेक्शनची मागणी केली. गुप्ताने फक्त ६ इंजेक्शन शिल्लक असल्याचे सांगितले. त्यांनी गुप्तावर विश्वास ठेवून ६ रेमडेसिविरची ऑर्डर दिली. एका इंजेक्शनचे ३ हजार रुपये याप्रमाणे १८ हजार रुपये त्यांनी मिस्त्रीच्या गुगल पे वरून ट्रान्स्फर केले. पैसे दिल्यानंतर सोमवारी (दि. १९) रात्री त्यांना पार्सल मिळाले.पार्सल उघडताच आतील थर्मल बॉक्समध्ये बर्फात ५ बाटल्या हाेत्या. त्यांवर कसलेच नाव नव्हते. संशय आल्याने त्यांनी गुप्ताला कॉल केला, पण ताे नॉट रिचेबल हाेता. अखेर त्यांनी मंगळवारी टिळकनगर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्याच्या आधारे तो पालघरला असल्याची माहिती त्यांना मिळाली. तपासाअंती त्याच्या मित्राच्या घरातून त्याला अटक करण्यात आली.रूपेशने आतापर्यंत घाटकोपर, अंधेरी, बोरिवली, दादर अशा ठिकाणी एकूण २९ जणांना बनावट इंजेक्शन विकले आहेत. तुम्हीही अशा प्रकारच्या एखाद्या टोळीच्या जाळ्यात अडकला असाल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.रेमडेसिविरऐवजी ट्राक्साॅलची विक्रीnगुप्ताने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पालघर येथील महालक्ष्मी मेडिकल येथे काम करणारा त्याचा ओळखीचा मित्र श्रवण रजपूत याच्या सांगण्यावरून अँटिबायोटिक औषध ट्राक्साॅल एस हे १ ग्रॅम पावडर फाॅर्ममध्ये असून त्याचा साईड इफेक्ट होत नाही, अशी माहिती रूपेशला मिळाली हाेती. nयाची रेमडेसिविर म्हणून विक्री केल्यास आर्थिक फायदा होईल, असे समजताच त्याने सोशल मीडियाच्या आधारे बनावट इंजेक्शनची विक्री सुरू केली.
३ हजार रुपयांत विक्रीरूपेश ३ हजार रुपयांत बनावट रेमडेसिविरची विक्री करत होता. त्यासाठी तो वेगवेगळ्या मोबाईल क्रमांंकांचा वापर करीत होता. त्याच्या गुगल पे वरील क्रमांकाच्या आधारे पाेलिसांचे पथक त्याच्यापर्यंत पोहोचले.