चारकोप येथील गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:06 AM2020-12-06T04:06:38+5:302020-12-06T04:06:38+5:30

चारकोप येथील गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडवणार डॉ. विनोद घोसाळकर यांचे आश्वासन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कांदिवली पश्चिम चारकोप ...

To solve the problems of housing societies in Charkop | चारकोप येथील गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडवणार

चारकोप येथील गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडवणार

Next

चारकोप येथील गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडवणार

डॉ. विनोद घोसाळकर यांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कांदिवली पश्चिम चारकोप येथील मुंबई उपनगरातील सर्वांत मोठी असणारी प्रबोधनकार ठाकरे नगर को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी युनियन लिमिटेडच्या वतीने चर्चासत्र आयोजित केले होते. अपना बाजार सभागृह चारकोप येथील गृहनिर्माण वसाहतीतील सोसायट्यांचे व रहिवाशांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हाडाच्या इमारत दुरुस्ती महामंडळाचे सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या चर्चासत्रात युनियनने आवाहन केल्याप्रमाणे १९० संस्थांचे सदस्य प्रतिनिधी उपस्थित होते.

या चर्चासत्रात प्रमुख पाहुणे विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख सुधाकर सुर्वे, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे व मनाली चौकीदर, पालिका शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, नगरसेविका शुभदा गुडेकर, विधानसभा संघटक संतोष राणे, उपविभागप्रमुख पांडुरंग देसाई, राजू खान, शाखाप्रमुख निखिल गुडेकर, काथे आदी मान्यवर उपस्थित होते.

या चर्चासत्रात एन. ए. टॅक्स, लीजरेंट, दंडव्याज माफी, सोसायटी ऑफिस, पाणीपुरवठा समस्या, सहकार खाते संदर्भात अडचणी इत्यादी विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले व निवेदने दिली. सदर निवेदने स्वीकारून हे प्रश्न मार्गी लावण्याकरिता जास्तीतजास्त प्रयत्न करण्याचे आश्वासन विनोद घोसाळकर यांनी दिले.

युनियनचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, सेक्रेटरी शशांक चौकीदार, खजिनदार अनंत बोंबले व त्यांच्या सर्व संचालकांनी व पांडुरंग देसाई यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष सहकार्य केले.

----------------------

Web Title: To solve the problems of housing societies in Charkop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.